Join us  

Video: भन्नाट... २ धावांमध्ये घेतल्या ९ विकेट्स!! १८ वर्षांच्या गोलंदाजाचा क्रिकेटमध्ये धमाका

Ava Lee Bowling, 9 Wickets in 2 Runs: १९३० नंतर तब्बल ९४ वर्षांनी झाली इतिहासाची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 2:29 PM

Open in App

Ava Lee Bowling, 9 Wickets in 2 Runs: क्रिकेटच्या मैदानात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. नुकतेच क्रिकेटच्या मैदानात अवघ्या १८ वर्षांच्या गोलंदाजाने धमाका केला. इंग्लंडची क्रिकेटपटू अवा ली हिने सीनियर महिला क्रिकेटमध्ये आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीने एक वेगळीच कहाणी लिहिली. व्हाईट बॉल क्रिकेट मॅचमध्ये सदर्न वायपर्स अकादमीकडून खेळणाऱ्या अवा ली हिने थंडर अकादमी विरुद्ध फक्त २ धावा देत तब्बल ९ बळी घेतले. पाहा व्हिडीओ-

७.३ षटकात २ धावा, ९ बळी

दोन्ही संघांमधील हा सामना बामफोर्ड फील्डहाऊस क्रिकेट क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात अवा ली हिने एकूण ७.३ षटकांची गोलंदाजी केली. यात तिने केवळ २ धावा दिल्या आणि चक्क ९ गडी बाद केले. महत्त्वाची बाब म्हणजे या स्पेलमध्ये तिने ५ षटके मेडन म्हणजे निर्धाव टाकली.

१९३० च्या विक्रमाची झाली पुनरावृत्ती

अवा ली वरिष्ठ महिला क्रिकेटमध्ये २ धावांत ९ बळी घेणारी दुसरी गोलंदाज ठरली. तिच्या आधी व्हायलेट स्ट्रेकरने १९३० मध्येही असाच पराक्रम केला होता. तसेच, १९६२ नंतर वरिष्ठ महिला क्रिकेटमध्ये अशी दमदार गोलंदाजी पहिल्यांदाच पाहायला मिळाली. १९६२ मध्ये रोझमेरी व्हाईट या महिला गोलंदाजाने एकही धाव न देता १० विकेट घेतल्या होत्या.

टॅग्स :इंग्लंडमहिला टी-२० क्रिकेट