Join us  

क्रिकेटही फुटबॉलच्या वाटेवर, आयसीसी उद्या मारणार 'रेड कार्ड'ची किक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उद्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु होणार असून फुटबॉलप्रमाणे आता क्रिकेटच्या मैदानावरही बेशिस्तपणा करणा-या खेळाडूंना रेडकार्ड दाखवण्यात येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 11:03 AM

Open in App
ठळक मुद्देनव्या नियमानुसार एखाद्या खेळाडूने मैदानावर गंभीर गैरवर्तन केले तर, त्याला संपूर्ण सामन्यासाठी मैदानाबाहेर काढले जाऊ शकते.

लंडन - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उद्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु होणार असून, फुटबॉलप्रमाणे आता क्रिकेटच्या मैदानावरही बेशिस्तपणा करणा-या खेळाडूंना रेडकार्ड दाखवण्यात येईल. दक्षिण आफ्रिका आणि यूएईमध्ये सुरु होणा-या कसोटी सामन्यापासून या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरु होईल. 

नव्या नियमानुसार एखाद्या खेळाडूने मैदानावर गंभीर गैरवर्तन केले तर, त्याला संपूर्ण सामन्यासाठी मैदानाबाहेर काढले जाऊ शकते. पंचांना धमकावणे, पंचाच्या दिशेने शेरबाजी, हातवारे करणे, मैदानावर धक्काबुक्की आणि अन्य कुठल्याही प्रकारचा हिंसाचार यापुढे खपवून घेतला जाणार नाही. क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये शाब्दीक शेरेबाजी सामान्य बाब बनली आहे. त्यामुळे क्रिकेटची जंटलमन्स गेम ही प्रतिमा हरवत चालली आहे. फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूंमध्ये शाब्दीक बाचाबाची, धक्काबुक्की अशा घटना सातत्याने घडत असतात. 

बॅटचा आकार : बॅटच्या लांबी-रुंदीच्या मापात कोणताही बदल नाही. मात्र बॅटच्या कडांचीजाडी ४० मिमीपेक्षा जास्त व मागील भागाच्या मधला फुगीरपणा ६७ मिमीपेक्षा जास्त असू शकणारनाही. फलंदाज खेळण्यासाठी घेऊन आलेली बॅट ‘वैध’ आहे की नाही हे ठरविण्यासाठी पंचांना बॅटच्या मोजमापाचे साधन (गेज) दिले जाईल.झेल :अ) क्षेत्ररक्षकाने सीमारेषेवर हवेत उडी मारून झेल पकडण्यासाठी सीमारेषेच्या आतून उडी मारली असेल तरच तो झेल वैध मानला जाईल अन्यथा चेंडू सीमापार गेला असे मानून चौकार दिला जाईल.ब) क्षेत्ररक्षक किंवा यष्टिरक्षकाच्या हेल्मेटवर आपटून आलेला चेंडू ‘डेड’ मानला जाणार नाही. अशा हेल्मेटवर आपटून आलेल्या चेंडूवरही फलंदाज झेलबाद, धावबाद किंवा यष्टिचीत होऊ शकेल.धावचीत :क्रीझच्या दिशेने धावणाºया किंवा झेप घेणाºया फलंदाजाची बॅट पॉपिंग क्रीझच्या आत टेकलेली असेल पण चेंडू प्रत्यक्ष यष्टीला लागताना त्याच्या शरीराचा जमिनीशी स्पर्श झालेला नसेल तरी त्याला धावचीत ठरविले जाणार नाही. यष्टिचीत होण्याचे टाळण्यासाठी मागे वळणाºया फलंदाजासही हाच नियम लागू असेल.बेशिस्त खेळाडूंवर कारवाई :पंचाला धमकावणे, त्याच्या अंगावर जाणे, धक्काबुक्की करणे आणि कोणावरही शारीरिक हल्ला करणे यासारखे बेशिस्त वर्तन ‘लेव्हल ४’ची बेशिस्त मानली जाईल व तसे करणाºया खेळाडूला पंच मैदानाबाहेर पाठवू शकेल.निर्णय फेरविचार पद्धत (डीआरएस)अ) कसोटी सामन्यात डावाचा खेळ ८० षटकांहून जास्त झाल्यानंतर पंचांचा निर्णयाचा ‘टॉप अप रिव्ह्यू’ मागता येणार नाही. ब) टी-२० सामन्यांमध्येही संघ ‘डीआरएस’चा वापर करू शकतील. क) पंचांच्या ‘कॉल’मुळे ‘डीआरएस’नंतर एखादा निर्णय कायम राहिला तर त्या संघाने ‘रिव्ह्यू’ची एक संधी गमावली, असे मानले जाणार नाही.

टॅग्स :क्रिकेट