नवी दिल्ली - २००७ चा वनडे विश्वकप क्रिकेटच्या इतिहासातील काळा अध्याय मानला जातो. वेस्टइंडिज इथं आयोजित या वर्ल्डकपमध्ये अशा काही घटना घडल्या होत्या ज्यानं क्रिकेटचं जग हादरले होते. एकीकडे भारतीय टीम बांग्लादेशाकडून पराभूत होऊन ग्रुपच्या स्पर्धेबाहेर पडली होती. ज्यामुळे भारतात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवागसारख्या खेळाडूंचे पुतळे जाळले होते. त्यांच्या घराबाहेर चाहत्यांनी गोंधळ घातला होता. त्याचवेळी पाकिस्तानी क्रिकेट टीमचे कोच बॉब वूल्मर यांच्या मृत्यूची बातमी समोर आली.
क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तानची टीम २००७ मध्ये एकमेकांना भिडली होती. त्यात पाक खेळाडूंची कामगिरी खराब झाली. १७ मार्चला भारत बांग्लादेशाकडून पराभूत होऊन टूर्नामेंटच्या बाहेर पडला होता आणि पाकिस्तानला आयर्लंडने हरवले होते. या मॅचच्या दुसऱ्याच दिवशी पाक क्रिकेट कोचचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
ही घटना १८ मार्च २००८ ची आहे. आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर निराश झालेले पाकिस्तानी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये परतले. या अखेरच्या क्षणी बॉब वूल्मर जीवित दिसले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते त्यांच्या खोलीतून बाहेर पडले नाहीत तेव्हा त्यांचा दरवाजा उघडण्यात आला. त्याठिकाणी बॉब वूल्मर मृतावस्थेत आढळले. हॉटेलच्या खोलीतील हे भयानक दृश्य पाहून वर्ल्डकपवेळी क्रिकेट विश्वात शोककळा पसरली होती.
मृत्यूचे कारण अस्पष्ट सुरुवातीच्या तपासात जमैका पोलिसांनी बॉब वूल्मर यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज वर्तवला. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यावर वूल्मर यांची हत्या झाल्याचं समोर आले. त्यांचा गळा दाबून खून झाला होता. या प्रकरणाची बराच वेळ चौकशी करण्यात आली. पाकिस्तानी क्रिकेटपटूंची चौकशी करण्यात आली पण ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे पुराव्याअभावी पोलिसांनी बॉबचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे घोषित करून प्रकरण बंद केले. बॉब वूल्मरच्या मृत्यूचे रहस्य त्यांच्यासोबत दफन झाले.
२००४ मध्ये बनले होते पाकिस्तानी टीमचे प्रशिक्षकबॉब वूल्मर यांना २००४ मध्ये पाकिस्तानचे प्रशिक्षक बनवण्यात आले होते. वूल्मर यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने नुकतीच चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली होती तोच विश्वचषकातील कामगिरीने पाकला निराश केले. वर्ल्डकपमधून बाहेर पडणे हा पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का होता. कोचिंग व्यतिरिक्त वूल्मर यांनी इंग्लंडसाठी १९ कसोटी आणि ६ एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १०५९ धावा केल्या आहेत तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या फक्त २१ धावा आहेत.