Join us  

चेतेश्वर पुजाराच्या घरी आली नन्ही परी, पत्नी पूजाने दिला मुलीला जन्म

क्रिकेटर चेतेश्वर पुजारा बाबा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 9:05 AM

Open in App

मुंबई- क्रिकेटर चेतेश्वर पुजारा बाबा झाला आहे. पुजाराच्या घरी कन्या रत्नाचं आगमन झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुजारा आणि त्याची पत्नी पूजा डाबरीने गुरूवारी (22 फेब्रुवारी) रोजी मुलीला जन्म दिला. पुजारा लवकरच याबद्दलची अधिकृत घोषण सोशल मीडियावरून करणार आहे. क्रिकेटर चेतेश्वर पूजारा सध्या दिल्लीमध्ये विजय हजारे ट्रॉफीसाठी खेळत आहे. चेतेश्वर व पूजाच्या विवाहानंतर पाच वर्षांनी त्यांच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. 13 फेब्रुवारी 2013 रोजी चेतेश्वर पुजाराचं लग्न झालं होतं. नुकतेच त्याच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले. 13 फेब्रुवारी रोजी पुजाराने ट्विटरवर पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करून लग्नाच्या वाढदिवसाबद्दल सांगितलं आहे. 

 

'आमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली. आता आणखी एक जण कुटुंबात येत आहे, पुढची वेळ खूप सुंदर आहे', असं ट्विट पुजाराने केलं होतं.घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याबद्दल पुजारा खूप उत्सुक होता. पुजारा पत्नी पूजा गरोदर असतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करायचा. पत्नी गरोदर असल्याची माहिती त्याने ट्विटरवरूनच त्याच्या फॅन्सला दिली होती. 31 डिसेंबर रोजी ट्विट करत त्याने चाहत्यांना ही खुशखबरी दिली होती. 

 

क्रिकेटर चेतेश्वर पुजाराने त्याची गर्लफ्रेण्ड पूजा डाबरीसह राजकोटमध्ये लग्न केलं होतं. क्रिकेट मैदानावर पुजाराला प्रोत्साहन देण्यासाठी पूजा नेहमी हजेरी लावताना दिसली. गेल्या वर्षी पुजारा जेव्हा इग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशिपसाठी खेळत होता तेव्हा पूजा त्याच्या बरोबर होती.  

टॅग्स :चेतेश्वर पुजारा