"सर बॉलीवूड जाओ"; दीपक चहरचा पत्‍नीसोबत लग्नाट भन्नाट डान्स; VIDEO झाला व्हायरल

दीपकच्या लग्नात अगदी जवळचे काही मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने दिल्लीत लग्नाचे रिसेप्शन दिले होते. यावेळी भारतीय क्रिकेट संघ आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सहकाऱ्यांनी हजेरी लावली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 06:35 PM2022-06-20T18:35:02+5:302022-06-20T18:38:35+5:30

whatsapp join usJoin us
Cricketer deepak chahar dance with wife jaya at his wedding goes viral | "सर बॉलीवूड जाओ"; दीपक चहरचा पत्‍नीसोबत लग्नाट भन्नाट डान्स; VIDEO झाला व्हायरल

"सर बॉलीवूड जाओ"; दीपक चहरचा पत्‍नीसोबत लग्नाट भन्नाट डान्स; VIDEO झाला व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने रविवारी त्यांच्या लग्नातील एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला, हा व्हिडिओ काही वेळातच जबरदस्त व्हायरल झाला आहे. दीपकने 1 जून रोजी आग्रा येथे जया भारद्वाज हिच्याशी लग्न केले. दीपक चहरने आग्रा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जया भारद्वाजसोबत लग्न केले. 

दीपकच्या लग्नात अगदी जवळचे काही मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने दिल्लीत लग्नाचे रिसेप्शन दिले होते. यावेळी भारतीय क्रिकेट संघ आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सहकाऱ्यांनी हजेरी लावली होती.

दीपक चहरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर डान्स परफॉर्मन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच, आपण हे करताना अत्यंत दबावात होतो, असे त्याने लिहिले आहे. चहर म्हणाला, क्रिकेटच्या पीचवर गोलंदाजी करण्यापेक्षाही मी डान्स करताना अधिक दबावात होतो. दीपकच्या या व्हिडिओवर काही चाहत्यांनी कमेंट करत त्याला बॉलिवूडमध्ये जाण्याचाही सल्ला दिला. कारण दीपकचा डान्स पाहून ते प्रभावित झाले.

दीपक चहर हनीमूनवरतून परतल्यानंतर बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाईल. तो पाठदुखीच्या समस्येचा सामना करत आहे. याच कारणामुळे त्याला आयपीएल 2022 मधूनही बाहेरच राहावे लागले. सीएसकेने त्याला 14 कोटी रुयांत खरेदी केले होते. मात्र, फिटनेसमुळे तो एकही सामना खेळू शकला नव्हता.
 

Web Title: Cricketer deepak chahar dance with wife jaya at his wedding goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.