कौतुकास्पद पुढाकार: भारताचा सलामीवीर गौतम गंभीरची 'स्त्री' वेशात एन्ट्री

तृतीय पंथीयांच्या एका कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच हजेरी लावली. त्याने नेहमीच तृतीय पंतीयांच्या समर्थनात भाष्य केले आहे, परंतु या कार्यक्रमातील त्याची एन्ट्री सर्वांना थक्क करणारी ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 09:31 AM2018-09-14T09:31:28+5:302018-09-14T09:31:52+5:30

whatsapp join usJoin us
Cricketer Gautam Gambhir wears dupatta and bindi to support transgenders | कौतुकास्पद पुढाकार: भारताचा सलामीवीर गौतम गंभीरची 'स्त्री' वेशात एन्ट्री

कौतुकास्पद पुढाकार: भारताचा सलामीवीर गौतम गंभीरची 'स्त्री' वेशात एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्लीः तृतीय पंथीयांच्या एका कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच हजेरी लावली. त्याने नेहमीच तृतीय पंतीयांच्या समर्थनात भाष्य केले आहे, परंतु या कार्यक्रमातील त्याची एन्ट्री सर्वांना थक्क करणारी ठरली. या कार्यक्रमात गंभीर चक्क 'स्त्री' वेशात दिसला. त्याने डोक्यावर ओढणी घेतली होती आणि कपाळावर टिकलीही लावली होती. या पाऊलाने सोशल मीडियावर गंभीरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

गंभीरने तृतीय पंथीयांच्या समर्थनात प्रथमच असा पुढाकार घेतलेला नाही. त्याने रक्षाबंधनाच्या दिवशीही त्यांच्याकडून राखी बांधून घेतली होती. ते फोटो त्याने ट्विटरवर पोस्टही केले होते. त्यात त्याने चांगला संदेशही लिहिला होता. तो म्हणाला होता की,' तुम्ही पुरुष आहात की स्त्री यापेक्षा तुम्ही चांगली व्यक्ती आहात का, हे महत्त्वाचे आहे. अभाना अहेर व सीमरन शेख यांच्याकडून राखी बांधून घेताना मला अत्यानंद होत आहे. तुम्ही असे कराल का?'



गंभीरने भारताकडून अखेरचा वन डे सामना 2016 मध्ये खेळला होता. 2011 विश्वचषक विजयात त्याने केलेली 97 धावांची खेळी ही महत्त्वपूर्ण होती. गंभीरने 58 कसोटी आणि 147 वन डे सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्याने मिळून 9392 धावा केल्या आणि त्यात 20 शतकांचा समावेश आहे.  

Web Title: Cricketer Gautam Gambhir wears dupatta and bindi to support transgenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.