Join us  

माझी क्वीन! क्रिकेटर इरफान पठाणने प्रथमच बुरख्याशिवाय पत्नीचा फोटो केला शेअर अन्... 

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण ( Irfan Pathan) आपल्या चाहत्यांचे नवनवीन सोशल मीडिया पोस्टद्वारे मनोरंजन करत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 9:57 AM

Open in App

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण ( Irfan Pathan) आपल्या चाहत्यांचे नवनवीन सोशल मीडिया पोस्टद्वारे मनोरंजन करत असतो. एक काळ असा होता की तो मैदानात आपल्या अष्टपैलू कामगिरीने प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धास्ती निर्माण केली होती. अलीकडेच इरफानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता, ज्यानंतर लाखो चाहते या फोटोला लाइक करत आहेत. 

सौदीतील मॉडेलच्या प्रेमात पडला भारतीय क्रिकेटपटू; वयात १० वर्षांचं अंतर, तरीही...

 इरफान पठाण सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. इरफानने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये इरफान त्याची पत्नी सफा बेगसोबत दिसत आहे. पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - माझ्या मागे एक राजवाडा आणि माझ्या बाजूला एक राणी. येथे त्याने पत्नीला राणी म्हटले आहे. या फोटोची खास गोष्ट म्हणजे यामध्ये इरफानची पत्नी सफाचा चेहरा दिसत आहे, त्यानंतर चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे. 

याआधीही इरफानने पत्नीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत, मात्र प्रत्येक फोटोमध्ये ती बुरखा घातलेली दिसत आहे. एकदा यावरून वाद झाला. जेव्हा तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा नाही तेव्हा तुम्ही फोटो का पोस्ट करता, असे चाहत्यांनी सांगितले होते. ज्यावर इरफान पठाण म्हणाला होता की, तिला चेहरा दाखवायचा नाही ही तिची वैयक्तिक इच्छा आहे. 

इरफान पठाणने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. इरफान सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळत आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय महाराजाकडून तो अष्टपैलू कामगिरी करताना दिसतो. भारतासाठी त्याने एकूण २९ सोटी, १२० वन डे आणि २४ ट्वेंटी-२०  सामने खेळले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :इरफान पठाणइन्स्टाग्राम
Open in App