Join us

IPL 2023 सुरू असताना पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ; मॉडेलचा विनयभंग आरोप अन् दाखल केला गुन्हा

इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2023) चा १६ वा हंगाम असताना दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 20:18 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2023) चा १६ वा हंगाम असताना दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडिया स्टार आणि भोजपूरी मॉडेल सपना गिलने या फलंदाजावर विनयभंगाचे गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारीमध्ये सपना गिल आणि पृथ्वी शॉच्या मित्रांमध्ये रस्त्यावर भांडण झालं होतं.

पृथ्वी शॉ, त्याचा मित्र आणि सपना गिलचा साथीदार मुंबईतील एका क्लबबाहेर एकमेकांशी भांडले होते. यानंतर सपना गिलने पृथ्वी शॉवर आरोप केला की, हा क्रिकेटर आणि त्याच्या मित्रांनी तिचा विनयभंग केला आणि हल्ला केला. पृथ्वी शॉविरोधात आता सपना गिलने कोर्टात धाव घेतली आहे. यावर १७ एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आयपीएल २०२३ च्या पहिल्या दोन सामन्यांत पृथ्वीला काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यावरून माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने त्याचे कान टोचले आहेत.  वीरेंद्र सेहवाग म्हणाला, 'पृथ्वी शॉने अनेकदा असेच शॉट्स खेळून आपली विकेट गमावली आहे. पण त्याने चुकांतून धडा घेण्याची गरज आहे. हे योग्य नाही का? तुम्ही शुभमन गिलकडे बघा. तो पृथ्वीसोबत १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळला आणि आता तो भारताच्या सीनियर संघाकडून कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. मात्र आयपीएलमध्ये पृथ्वीचा संघर्ष सुरूच आहे.''

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :पृथ्वी शॉगुन्हेगारीआयपीएल २०२३
Open in App