भरधाव वेगामुळे रिषभ पंतला गेल्याच आठवड्यात २ वेळा दंड ठोठावलेला, ट्राफिक पोलिसांनी पाठवलेली नोटीस! पण...

Rishabh Pant Accident News: भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू रिषभ पंत याचा शुक्रवारी दिल्ली-डेहरादून महामार्गावर भीषण अपघात झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 03:03 PM2022-12-30T15:03:05+5:302022-12-30T15:04:36+5:30

whatsapp join usJoin us
cricketer rishabh pant car challaned by up traffic police for overspeeding in december 2022 | भरधाव वेगामुळे रिषभ पंतला गेल्याच आठवड्यात २ वेळा दंड ठोठावलेला, ट्राफिक पोलिसांनी पाठवलेली नोटीस! पण...

भरधाव वेगामुळे रिषभ पंतला गेल्याच आठवड्यात २ वेळा दंड ठोठावलेला, ट्राफिक पोलिसांनी पाठवलेली नोटीस! पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rishabh Pant Accident News: भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू रिषभ पंत याचा शुक्रवारी दिल्ली-डेहरादून महामार्गावर भीषण अपघात झाला. रस्त्याच्या दुभाजकाला रिषभच्या कारनं जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कार जळून खाक झाली आहे. तर रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालवत असताना डुलकी लागल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण गेल्याच आठवड्यात रिषभनं कारची वेगमर्यादा न पाळल्यामुळे दोनवेळा ट्राफिक पोलिसांकडून दंड ठोठावण्यात आला होता. 

रिषभच्या पायाची लिगामेंट तुटली, दिल्लीला नेणे धोक्याचे; आमदाराने सांगितले तासाभरात काय काय घडले...

उत्तर प्रदेश पोलिसांकडून ऋषभ पंत याला दंडाची रक्कम भरण्यासाठीची नोटीस देखील पाठवली होती. नोटिसमधील नमूद माहितीनुसार, २२ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता रिषभ पंतच्या मर्सिडिज कारनं (DL10 CN 1717) वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं होतं. कार ओव्हर स्पीड असल्याचं रस्त्यावर बसवण्यात आलेल्या कॅमेरांनी टिपलं होतं. यासाठी मोटार वाहन अधिनियम अंतर्गत पंतच्या नावाने २ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस जाहीर करण्यात आली होती. दंडाची रक्कम अद्याप भरण्यात आली नव्हती. 

रिषभच्या कपाळावर दोन व्रण, गुडघ्याला मार अन् मनगट, पाय, पाठीला दुखापत; BCCIच मेडिकल बुलेटिन

२५ डिसेंबर रोजीही दुपारी ५ वाजताच्या सुमारास रिषभनं पुन्हा एकदा याच कारमधून वेगमर्यादाच्या नियमाचं उल्लंघन केलं होतं. याबाबतची २ हजार रुपयांच्या दंडाची नोटिस रिषभ पंतला पाठवण्यात आली होती. यूपी सरकारच्या परिवहन विभागानुसार दोन्ही वेळच्या दंडाची रक्कम अद्याप भरण्यात आलेली नाही. पण २२ आणि २५ डिसेंबर या दोन्ही वेळेस रिषभ पंत कार चालवत नव्हता. रिषभ त्यावेळी बांगलादेश दौऱ्यावर होता. त्यामुळे रिषभची कार त्यावेळी कोण चालवत होतं याची माहिती कळू शकलेली नाही. 

रिषभचा आज पहाटे भीषण अपघात
रिषभ पंत आज पहाटे दिल्लीहून रुडकी स्थित आपल्या राहत्या घरी परतत होता. यावेळी त्याची मर्सिडीज कार तो स्वत: चालवत होता. शुक्रवारी पहाटे जवळपास साडेपाच वाजताच्या सुमारास रिषभला कार चालवत असताना डुलकी लागली आणि कारवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला. कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. यात कारनं पेट घेतला. रुडकी जवळील मोहम्मदपूर येथे हा भीषण अपघात घडला. 

ऋषभ पंतचा लक्झरी कारमध्ये अपघात; किती सुरक्षित होती पंतची Mercedes ? जाणून घ्या...

अपघातानंतर रिषभ पंत कारची खिडकी तोडून बाहेर आला होता. त्यानंतर स्थानिक लोकांनी रिषभची मदत केली आणि त्याला तातडीनं रुग्णालयात पोहोचवलं. रिषभ कारमधून बाहेर आल्यानंतर कारनं पेट घेतला होता. कार आगीच जळून खाक झाली आहे. स्थानिकांनी १०८ नंबरवर फोन करुन अॅम्ब्युलन्स बोलावली आणि रिषभला रुडकी येथील सक्षम रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cricketer rishabh pant car challaned by up traffic police for overspeeding in december 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.