नवी दिल्ली - टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा सध्या जगातील सर्वोत्तम सलामीवीर आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील तीन द्विशतके असोत अथवा टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक असो, रोहितच्या बॅटने मोठ-मोठे विक्रम केले आहेत. कधी मर्यादित षटकांमधील जगातील सर्वोत्तम सलामीवीर मानल्या जाणाऱ्या रोहितने, आता काही दिवसांत कसोटी क्रिकेटमध्येही आपले नाणे खणखणित असल्याचे दाखवण्यास सुरुवात केली आहे. रोहितने भारताच्या कसोटी संघात आपले स्थान पक्के केले आहे आणि यामुळे अनेक खेळाडूंचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.
रोहित येताच या फलंदाजाचे करिअर संपले... -
रोहित शर्माने कसोटी संघात आपले स्थान पक्के केल्यानंतर, असे अनेक फलंदाज आहेत ज्यांचा पत्ता संघातून कायमचा कापला गेला आहेत. यातच एक नाव आहे मुरली विजय.मुरली विजय हा एकेकाळी टीम इंडियाचा सर्वात विश्वासू सलामीवीर होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून विजयला संघात स्थान देण्यात आलेले नाही. विजयने डिसेंबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. यानंतर सर्वप्रथम मयंक अग्रवाल आणि नंतर रोहित शर्माने त्याचा पत्ता संघातून पूर्णपणे कापला. आता विजयला पुन्हा संघात स्थान मिळेल, असे वाटत नाही. कारण आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुरली आता कुठेही तेवढा सक्रिय दिसत नाही.
धवनलाही मिळेना संधी -
मुरली विजयशिवाय आणखी एक खेळाडू आहे, ज्याची कारकिर्द रोहित शर्माच्या संघात आल्यानंतर संपली. तो म्हणजे शिखर धवन. मात्र, धवन अजूनही भारतासाठी एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांत खेळताना दिसतो. पण, तो बऱ्याच दिवसांपासून कसोटी संघात दिसलेला नाही. कारण सध्या भारतीय संघाकडे सध्या एवढे सलामीवीर आहेत की, धवन आणि विजयसारख्या फलंदाजांची गरजच पडत नाही.
मुरली विजयचे करिअर -
मुरली विजयने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 61 सामने खेळले, ज्यात त्याने 3982 धावा केल्या. यादरम्यान त्याने 12 शतकेही झळकावली आहेत. त्याला एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळाली नाहीत आणि तो काही विशेष करूही शकला नाही. गेल्या ३ वर्षांपासून तो संघाबाहेर आहे आणि आता रोहित शर्मा व केएल राहुलचा फॉर्म पाहता आगामी काळात त्याला संघात स्थान मिळणेही अवघड, असल्याचे दिसते.
Web Title: cricketer Rohit Sharma end the career of murali vijay once he was virat kohli favourite batsman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.