भारताच्या वन डे क्रिकेट संघाचा उप कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे आणि तत्पूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी दिली आहे. या सुट्टीत रोहित शर्मासह टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडमध्ये भटकंती करताना दिसत आहेत. दरम्यान, रोहितनं त्याची लोणावळा येथील ५.२५ कोटींचा बंगला विकला आहे. त्याची प्रॉपर्टी मुंबईच्या सुष्मा अशोक सराफ नावाच्या महिलेनं विकत घेतली आहे. zapkey.com ने याबाबतचे सर्व व्यवहार पत्रांची माहिती दिली आहे.
रोहितचा हा बंगला ६३२९ स्क्वेअर फूटावर आहे आणि २९ मे २०२१मध्ये या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन झाले आहे. रजिस्ट्रीनुसार रोहित शर्मानं २६ लाख रुपयांची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. लोणावळा हे लोकांच्या आवडतीचं हिल स्टेशन आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या हिल स्टेशनला अनेकांची पसंती आहे. त्यामुळे अनेकांनी येथे बंगले खरेदी केले आहेत. रोहितच्या प्रॉपर्टीची प्रती स्क्वेअर फूट किंमत ही ८३०० इतकी आहे.
केन विलियम्सन पुन्हा अव्वल स्थानी विराजमान, रोहित शर्माचाही मोठा पराक्रम
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंना आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झालेला पाहायला मिळाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं. ( Kane Williamson is the new number 1 ranked Test batsman in the world) भारताविरुद्धच्या फायनलपूर्वी केननं कसोटी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावले होते, परंतु फायनलमध्ये त्यानं दोन्ही डावांत ४९ व नाबाद ५२ धावा करून पुन्हा अव्वल स्थान पटकावले. आयसीसीनं आज जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताच्या रोहित शर्मानंही ( Rohit Sharma) मोठा पराक्रम केला.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ९०१ गुणांसह अव्वल स्थानी आला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ( ८९१), ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन ( ८७८), टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( ८१२) आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( ७९७) टॉप फाईव्ह मध्ये आहेत. रोहित शर्मानं कारकीर्दितील सर्वोत्तम रेटींग पॉईंट्सची कमाई केली. त्यानं ७५९ गुणांसह सहावे स्थान पटकावताना रिषभ पंतला ( ७५२) मागे टाकले. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला खेळणाऱ्या फलंदाजांत रोहित टॉपवर आहे.
Web Title: Cricketer Rohit Sharma sells Lonavla property for Rs 5.25 crore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.