नवी दिल्ली - क्रिकेटचा देव आणि दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरची 21व्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. स्टार स्पोर्ट्सच्या पोलमध्ये सचिन तेंडुलकरने 21व्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या शर्यतीत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगाकाराला मात दिली आहे. स्टार स्पोर्ट्सच्या कॉमेन्ट्री पॅनलमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठान आणि आकाश चोपरा सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता.
गावस्कर म्हणाले, सचिन तेंडुलकर आणि कुमार संगाकारा यांच्यात 21व्या शतकातील सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीत काट्याची टक्कर बघायला मिळाली. सचिन तेंडुलकरने 8 वर्षांपूर्वीच म्हणजे 2013 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीचे अनेक मोठे विक्रम सचिन तेंडुलकरच्या नेवे आहेत. सचिन तेंडुलकरने टेस्ट क्रिकेटमध्ये 15921 धावा फटकावल्या आहेत आणि तो लॉंग फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीत 51 शतकं ठोकली आहेत. जॅक कॅलिस हा 45 शतकांसह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू आहे.
17 वर्षांचा असतानाच ठोकले होते शतक-कसोटी क्रिकेटमध्ये संगाकाराच्या नावे 38 शतके आहेत आणि तो सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक धावा ठोकणाऱ्या खेळाडूंचा विचार करता या यादीत संगाकारा सहाव्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने 16 वर्षांचा असतानाच टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. एवढेच नाही, तर 17 वर्ष 107 दिवसांचा असताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये शतक लगावले होते आणि तो अशी कामगिरी करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला होता. 2002 मध्ये विजड्नने सचिन तेंडुलकर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम खेळीडू असल्याचे म्हटले होते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक ठोकणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव क्रिकेटर आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्येही सर्वोत जास्त धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्याच नावे आहे.