भारतीय क्रिकेटर शिवम दुबे (Shivam Dube) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड अंजुम खानसोबत (Anjum Khan) मुंबईत लग्न केले. यानंतर त्याने सोशल मिडियावर चाहत्यांना यासंदर्भात माहितीही दिली. यावर शिवमला शुभेच्छा मिळतील अशी अपेक्षा होती. अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्याही. मात्र, अनेकांनी धार्मिक द्वेषदेखील पसरविण्याचे काम केले. तसेच मुस्लीम समाजाचा उल्लेख दहशतवादी असाही केला. (Cricketer Shivam Dube asked for prayers in marriage with Anjum Khan people made lewd comments after seeing the photo)
शिवम दुबेने आपल्या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यांतील एका फोटोत तो मुस्लीम पद्धतीने प्रार्थना करताना दिसत आहे. हाच फोटो अनेकांना आवडला नाही आणि त्यांनी द्वेष पसरवायला सुरुवात केली. या लोकांनी शिवम आणि मुस्लीम समुदायाच्या लोकांसंदर्भात अनेक आक्षेपार्ह कॉमेंट केल्या. या लोकांनी लग्नाच्या शुभेच्छा तर दिल्या नाहीतच, उलट कमेंट बॉक्समध्ये अनेक आक्षेपार्ह कमेंट केल्या.
या लोकांनी अंजुमने कुंकू न लावण्यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले आणि या कपलची तुलना निखिल जैन आणि नुसरत जहांसोबत केली. जे नुकतेच वेगळे झाले आहेत.
यावेळी काही लोकांनी शिवम आणि अंजुमला लग्नासाठी आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
एक झाले शिवम आणि अंजुम -
शिवम दुबेने ट्विटरवर आपल्या लग्नाचा फोटो शेअर करताना लिहिले आहे, "आम्ही प्रेम केले. ते प्रेमापेक्षाही अधिक होते. आता येथूनच आमची सुरुवात होत आहे. जस्ट मॅरिड 16-07-2021." या फोटोत शिवम अंजुमला अंगठी घालताना दिसत आहे. हे दोघेही अत्यंत क्यूट दिसत आहेत.
शिवम सध्या भारतीय संघाबाहेर आहे. त्याने भारतासाठी एक एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत. शिवम दुबेची एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३.५ अशी सरासरी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला गोलंदाजीत यश मिळालेले नाही. मात्र टी-२० मध्ये त्याने ५ बळी मिळवले आहेत. मात्र सुमार कामगिरीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर जावे लागले आहे.
Web Title: Cricketer Shivam Dube asked for prayers in marriage with Anjum Khan people made lewd comments after seeing the photo
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.