Join us  

क्रिकेटच्या मैदानातच ह्रदयविकाराचा झटका आल्याने क्रिकेटपटूचा मृत्यू, व्हिडीओ व्हायरल 

क्रिकेट सामना सुरु असताना मैदानातच एका खेळाडूला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 6:36 PM

Open in App

तिरुवनंतपुरम - क्रिकेट सामना सुरु असताना मैदानातच एका खेळाडूला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. न्यूज 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील कसारागौड येथे स्थानिक क्रिकेट सामन्यात 20 वर्षीय पद्मनाभ या खेळाडूला ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. पद्मनाभ गोलंदाजी करत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो मैदानात कोसळला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंजेश्वारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पद्मनाभ करत असलेल्या बॉलिंगचं मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जात होतं. त्यामुळे घडलेला संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, पद्मनाभ बॉलिंग करत होता आणि त्याच दरम्यान तो अंपायरजवळ खाली बसला. मग, पद्मनाभ मैदानातच झोपला. त्यानंतर मैदानात उपस्थित सर्व खेळाडू पद्मानाभजवळ जाताना दिसत आहेत. 

पाहा व्हिडिओ -

मैदानातच खेळाडूचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना नाहीये. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. 2015 मध्ये बंगालमधील क्रिकेटरची फिल्डिंग करताना एकमेकांना धडक झाली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.