Join us  

क्रिकेटपटूंच्या पत्नी, प्रेयसींसाठी वेगळा अधिकारी नाही; कुटुंबीयांवर खेळाडूंनीच स्वत: खर्च करावा

क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि प्रेयसींच्या राहण्याची व्यवस्था भारतीय बीसीसीआयकडून करण्यात येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) घेतली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 3:56 AM

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि प्रेयसींच्या राहण्याची व्यवस्था भारतीय बीसीसीआयकडून करण्यात येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) घेतली.यामुळे द. आफ्रिका दौºयावर असलेल्या भारतीय खेळाडूंच्या पत्नी व प्रेयसींच्या निवास आणि पर्यटनाची व्यवस्था करण्यासाठी वेगळा अधिकारी दौºयावर पाठविण्याच्या बोर्डाच्या विचारावर पाणी फेरले गेले.भारतीय संघातील खेळाडूंपैकी विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, मुरली विजय, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा या खेळाडूंना पत्नीबरोबर दोन आठवडे राहण्याची परवानगी बीसीसीआयने दिली. एका वृत्तानुसार भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणिप्रेयसी खेळाडूंबरोबर द. आफ्रिका दौºयावर आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी एका अधिकाºयाची नियुक्ती करण्यात येणार होती. हा अधिकारी क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांच्या गरजेनुसार त्यांना पर्यटन, तसेच कार्यक्रमांच्या आखणीचे काम पाहणार होता. ४ जानेवारी रोजी आफ्रिकेला जाणार होता. त्याआधी बीसीसीआयची योजना सीओएने फेटाळून लावली.क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी ऋषीकेश उपाध्याय या अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली. तो सध्या आफ्रिकेतच आहे. त्याच कामासाठी वेगळा अधिकारी पाठविण्याची गरज नसल्याचे सीओएचे मत आहे.क्रिकेटर्सच्या पत्नींना सामना संपल्यानंतर शॉपिंग करायची असल्यास त्याची व्यवस्था करण्यासाठी बीसीसीआयचा अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यासाठी बीसीसीआयचे लॉजिस्टिक्स इन्चार्ज मयंकपारिख यांचे नावही सुचविण्यात आले होते. मात्र हा प्रस्तावही सीओएने फेटाळून लावला.

टॅग्स :क्रिकेट