Join us  

क्रिकेटपटूंच्या बायका ठरतायत बीसीसीआयसाठी डोकेदुखी; 'हे' आहे कारण

विराट कोहलीने बीसीसीआयकडे पत्नी किंवा मैत्रिणींनाही परदेश दौऱ्यात खेळाडूंबरोबर ठेवावे, अशी मागणी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 4:26 PM

Open in App

नवी दिल्ली : खेळाडूंचे मानसीकत संतुलन चांगले असावे, यासाठी मोठ्या दौऱ्यावर त्यांच्या पत्नी किंवा मैत्रिणींनाही नेले जाते. बीसीसीआयनेही ही गोष्ट केली खरी. पण आता हीच गोष्ट बीसीसीआयसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

परेदशातील दौऱ्यांमध्ये क्रिकेटपटूंबरोबर पत्नी किंवा मैत्रिणींना दोन आठवडे राहण्याची परवानगी बीसीसीआयने दिली होती. ही गोष्ट इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दौऱ्यासाठी कायम ठेवण्यात आली होती. यावेळी भारतीय संघात ज्यांचे स्थान कायम नाही, त्यांनीही आपल्या पत्नी किंवा मैत्रिणींना संघाबरोबर ठेवले होते. त्यामुळे एकूण 40 व्यक्ती बीसीसीआयच्या खर्चाने फिरत होत्या. बीसीसीआयसाठी पैसा ही समस्या नाही. पण तरीही पत्नी किंवा मैत्रिणींनी बीसीसीआयसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे पत्नी किंवा मैत्रिणींनाही परदेश दौऱ्यात खेळाडूंबरोबर ठेवावे, अशी मागणी केली होती. बीसीसीआयने ही गोष्ट मान्य केली होती. त्यानुसार बीसीसीआयने परदेश दौऱ्यापूर्वी 10 दिवस पत्नी किंवा मैत्रिणींना खेळाडूंबरोबर राहण्याची मुभा दिली होती.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, “ जेव्हा पत्नी किंवा मैत्रिणींनी खेळाडूंबरोबर असतात तेव्हा बऱ्याच गोष्टींची व्यवस्था पाहावी लागते. हॉटेलमधील रुमपासून ते त्यांचा प्रवास, त्यांना स्टेडियममध्ये प्रवेशिका उपलब्ध करून देणे किंवा त्यांना कुठे बाहेर जायचे असेल तर त्याची व्यवस्थाही करावी लागले. त्यामुळे आगामी विश्वचषकात जर खेळाडूंबरोबर त्यांच्या पत्नी किंवा मैत्रिणी असतील तर बीसीसीआयसाठी ही फार मोठी डोकेदुखी असेल.“

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय