कोलंबो : श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा साऱ्यांनाच परीचित. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून तो खेळतो. मलिंगाची पत्नी तान्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार थिसारा परेरावर गंभीर आरोप केले आहेत. या साऱ्या प्रकरणामुळे श्रीलंकेच्या संघातील वातावरण दुषित झाल्याचे म्हटले जात आहे.
तान्याने हे गंभीर आरोप थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहेत. त्यामुळे फक्त श्रीलंकेमध्ये नाही तर जगभरात या आरोपांची चर्चा सुरु आहे. परेराने या आरोपांनंतर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने हस्तक्षेप करावा, असे अपील केले आहे.
तान्याने जे आरोप केले आहेत, त्यावर परेराने पलटवार केला आहे. फेसबूकवर पलटवार करताना परेराने 2018 सालचा दाखला दिला आहे. त्याचबरोबर श्रीलंका क्रिकेट मंडळातील अधिकारी अॅश्ले डिसिल्वा यांना परेराने पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये परेराने लिहीले आहे की, “ जर मलिंगाची पत्नी सोशल मीडियावरून माझ्यावर गंभीर आरोप करणार असेल तर मी ते सहन करणार नाही. कारण लोकांना तिची गोष्ट खरी वाटेल आणि तिला सहानुभूती मिळेल. त्याचबरोबर लोकांचा विश्वासही कायम राहणार नाही. “
परेराने पत्रामध्ये नेमके काय लिहीले आहे, ते वाचा...
तान्याच्या आरोपानंतर संघातील खेळाडूंचा माझ्याबरोबरचे बोलणे बदलले आहे. जेव्हा दोन अनुभवी खेळाडूंमध्ये वाद होतो तेव्हा संघातील वातावरण बिघडते. या साऱ्या गोष्टीमुळे संघाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे क्रिकेट मंडळाने या प्रकरणता लक्ष घालायला हवे. हे प्रकरण जेवढ्या लवकर निकाली लागेल तेवढे संघासाठी ते फायद्याचे असेल, असे परेरा म्हणाला.
तान्याने परेरावर काय केला गंभीर आरोप
परेराची कामगिरी चांगली होत नव्हती. त्याला संघातून डच्चू देण्यात येणार होता. ही गोष्ट परेराला समजली. त्यावेळी परेरा थेट क्रीडा मंत्र्यांकडे गेला आणि त्यानंतर त्याचे संघातील स्थान अबाधित राहिले, असे तान्याने म्हटले आहे.
Web Title: Critical allegations against by Lasith Malinga's wife in thisara parera
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.