Crowd in the Mumbai got out of control to see Rohit sharma : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या विश्रांती करतोय. इंग्लंड व वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रोहित मायदेशात परतला आहे आणि आशिया चषक स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. आगामी झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याच्यासह भारताच्या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. २७ ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा होणार आहे आणि २० तारखेला भारतीय संघ यूएईला रवाना होण्याची शक्यता आहे. त्याआधी भारतीय खेळाडू कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. बराच काळ क्रिकेटपासून दूर असलेला विराट कोहलीही सरावाला लागला आहे. हार्दिक पांड्या कुटुंबियांसोबत फिरायला गेला आहे. दरम्यान, मुंबईत असलेल्या रोहितमुळे सोमवारी मुंबई पोलिसांचं काम वाढल्याचं पाहायला मिळालं.
रोहितची एक झलक पाहण्यासाठी मुंबईच्या कुलाबा येथील हॉटेलबाहेर एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. स्वातंत्र्य दिनी रोहित एका कार्यक्रमासाठी कुलाबा येथे आल्याचे चाहत्यांना समजले अन् त्याला भेटण्यासाठी हॉटेलबाहेर तौबा गर्दी झाली. या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. चाहत्यांची एवढी गर्दी पाहून रोहित पुन्हा हॉटेलमध्ये गेला अन् गर्दी कमी झाल्यावरच बाहेर पडला.
आशिया कपसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर जडेजा, आर अश्विन, वाय चहल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान | स्टँड बाय खेळाडू- श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर
आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक
- २७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- २८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- ३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- ३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- १ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- २ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- ३ सप्टेंबर - B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- ४ सप्टेंबर - A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- ६ सप्टेंबर - A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- ७ सप्टेंबर - A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- ८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- ९ सप्टेंबर - B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
- ११ सप्टेंबर - अंतिम सामना, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)cr
Web Title: Crowd in the Mumbai got out of control to see Indian cricket captain Rohit sharma in the Mumbai but Rohit has to move back to hotel due to so much gatherings, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.