भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाच्या तयारीसाठी चेन्नईत दाखल झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) चा कॅम्प चेन्नईत ९ मार्चपासून सुरू होणार असल्याचे CSKच्या CEOनी सांगितली. पण, तत्पूर्वी महेंद्रसिंग धोनी ( Mahi) यानं राजस्थानातील साचोर जिल्ह्यात भेट दिली आणि तेथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी तौबा गर्दी केली. धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी कोरोना नियमांना पायदळी तुडवले. कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या वाढली अन् पाकिस्तान सुपर लीग गुंडाळावी लागली
येथील शाळेचं उद्धाटन करण्यासाठी धोनी आला होता. त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली आणि आयोजनकांना बॅरीगेड्स लावावे लागले. गर्दी नियंत्रणाबाहेर होत असल्याचे दिसताच धोनीला गाडीत बसवून अहमदाबाद येथे पाठवण्यात आले. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शाळेचे फाऊंडर धरमचंद जैन आणि धोनी हे दोघेही मित्र आहेत. चल फूट!; सुनील गावस्कर संतापले अन् लाईव्ह सुरू असताना खडेबोल सुनावले
धोनी, अंबाती, ऋतुराज पोहोचले चेन्नईत
इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या तयारीसाठी धोनी गुरुवारी चेन्नईत दाखल झाला. त्याच्याआधी अंबाती रायुडू व ऋतुराज गायकवाड हेही तेथे पोहोचले आहेत. ९ मार्च पासून CSKचा कॅम्प सुरू होईल
Web Title: Crowd in Rajasthan goes berserk to catch a glimpse of MS Dhoni; After that Dhoni reached in Chennai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.