दीपक चहरने केला 'मंकडिंग' करण्याचा प्रयत्न; विजय शंकरही हैराण, धोनीच्या रिॲक्शनने वेधलं लक्ष

गुजरातविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने १५ धावांनी विजय मिळवला आणि १०व्यांदा चेन्नई संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:07 AM2023-05-24T11:07:15+5:302023-05-24T12:26:45+5:30

whatsapp join usJoin us
CSK Bowler Deepak Chahar attempts to mankad GT Bastman Vijay Shankar in Qualifier one match | दीपक चहरने केला 'मंकडिंग' करण्याचा प्रयत्न; विजय शंकरही हैराण, धोनीच्या रिॲक्शनने वेधलं लक्ष

दीपक चहरने केला 'मंकडिंग' करण्याचा प्रयत्न; विजय शंकरही हैराण, धोनीच्या रिॲक्शनने वेधलं लक्ष

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

यंदाच्या आयपीएलमध्ये थेट अंतिम फेरी गाठताना चेन्नई सुपरकिंग्जने पहिल्या क्वालिफायर लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सला १५ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर २० षटकांत ७ बाद १७२ धावा केल्यानंतर चेन्नईने गुजरातला २० षटकांत १५७ धावांवर गुंडाळले. 

धोनी हा एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो जो सामन्यादरम्यान योग्य रणनीती, योग्य समन्वय आणि योग्य प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरतो. धोनीची रणनीती नेहमीच यशस्वी ठरली आहे. एवढेच नाही तर धोनी सामन्यादरम्यान योग्य निर्णय घेण्यासाठी देखील ओळखला जातो. यामुळेच धोनीला आयसीसीने 'स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डिकेड' हा पुरस्कारही दिला आहे. याचदरम्यान काल झालेल्या गुजराविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये धोनीने असे काही केले आहे की चाहत्यांना अभिमान वाटत आहे.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने १५ धावांनी विजय मिळवला आणि १०व्यांदा चेन्नई संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. या सामन्यादरम्यान गोलंदाज दीपक चहरने गुजरातचा फलंदाज विजय शंकरला 'मंकडिंग' करून धावबाद करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दुसरीकडे दीपकचे हे कृत्य पाहून विजय शंकरलाही धक्का बसला, पण आपल्या गोलंदाजाची ही हुशारी पाहून धोनीने ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली, त्याने चाहत्यांची मने जिंकली. वास्तविक, दीपकने असे कृत्य केल्याचे धोनीने पाहताच तोही हसायला लागला. धोनीचे हावभाव पाहून असे वाटले की माही अशा प्रकारे फलंदाजाला बाद करण्याच्या विरोधात आहे. 

दरम्यान, चेन्नईने गुजरातविरुद्ध पहिल्यांदाच विजयही मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलने अपेक्षित खेळी केली खरी, मात्र त्याच्या फलंदाजीत फारशी आक्रमकता दिसली नाही. परंतु, त्याचा अपवाद वगळता इतर प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. गुजरातचा अर्धा संघ ८८ धावांवर बाद करत चेन्नईने सामन्यावर पकड मिळवली. राशिद खानने पुन्हा एकदा शानदार फटकेबाजी करत गुजरातच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र त्याला देखील अपयश आले.

Web Title: CSK Bowler Deepak Chahar attempts to mankad GT Bastman Vijay Shankar in Qualifier one match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.