CSK CEO Kasi Vishwanathan on Ambati Rayudu: इंडियन प्रीमिअर लीग २०२०मध्ये सुरेश रैना प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्या पर्वत चेन्नई प्रथमच प्ले ऑफमध्ये पात्र ठरली नाही आणि गुणतालिकेत तळाशी राहिली. असेच काहीसे चित्र आयपीएल २०२२ मध्ये पाहायला मिळतेय.. रवींद्र जडेजाला कर्णधार करणे, ८ सामन्यांनंतर त्याच्याकडून ते काढून घेणे. पुढे, दुखापतीमुळे त्याला बाकावर बसवणे आणि नंतर जडेजाने आयपीएल २०२२मधून माघार घेण्याचा निर्णय घेण, हा सर्व गुंता सुटतो ना सुटतो तोच अंबाती रायुडूने ( Ambati Rayudu) शनिवारी निवृत्तीचा बॉम्ब टाकला अन् १५ मिनिटानंतर तो फुस्का ठरला. रायुडूने निवृत्तीचे ट्विट डिलीट केले. या सर्वात आता CSK चे CEO काशी विश्वनाथन ( Kasi Vishwanathan ) यांनी मोठे विधान केले आहे.
अंबाती रायुडूचं ट्विट....''ही माझी शेवटची आयपीएल स्पर्धा असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडून १३ वर्षे मला IPL खेळायला मिळालं. या दोन्ही संघांनी मला खूप काही दिलं आणि खूप शिकवलं. मुंबई आणि चेन्नई या दोन संघांचे आभार. माझ्या IPL क्रिकेट प्रवासाला त्यांच्यामुळेच अर्थ आला'', असे ट्विट रायुडूने केले होते. पण, १५ मिनिटांत ते डिलीटही केले.
रायुडूची मुंबई इंडियन्ससाठी कामगिरी
- धावा - २४१६
- सरासरी - २७.१५
- स्ट्राईक रेट - १२६.१६
- अर्धशतकं - १४
रायुडूची चेन्नई सुपर किंग्सकडून कामगिरी
- धावा - १७७१
- सरासरी - ३२.८०
- स्ट्राईक रेट - १२८.८
- अर्धशतकं - ८
- शतक - १
यंदाच्या पर्वात रायुडूने १२ सामन्यांत १० डावांत २७.१०च्या सरासरीने २७१ धावा केल्या आहेत. रायुडूने ट्विट डिलिट केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथन यांची प्रतिक्रिया आली. ते म्हणाले, रायुडू निवृत्त होत नाहीय... तो आमच्यासोबतच राहणार आहे. कदाचित तो यंदाच्या पर्वातील स्वतःच्या कामगिरीवर आनंदी नाही आणि त्यातून त्याने हे ट्विट केलं असावं. ही मानसिक गोष्ट आहे, असे मला वाटते. तो आमच्यासोबत आहे.