CSK full schedule in IPL 2023 : MS Dhoni Retirement - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2023) हे खेळाडू म्हणून शेवटचे वर्ष आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२३ चे वेळापत्रक कालच जाहीर केले आणि त्यातूनच धोनीच्या निरोपाच्या सामन्याती तारीख समोर आली. दोन वर्षांनंतर सर्व फ्रँचायझी त्यांच्या त्यांच्या घरच्या मैदानावर आयपीएल सामने खेळणार आहेत आणि धोनीच्या निरोपाच्या सामन्यात चेपॉक सज्ज राहणार आहे. यंदाच्या पर्वात CSK प्ले ऑफसाठी पात्र न ठरल्यास १४ मे रोजी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध होणारा सामना हा धोनीचा घरच्या मैदानावरील अखेरचा सामना ठरू शकतो. CSK ला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना करायचा आहे.
Breaking : स्मृती मानधनाची RCBच्या कर्णधारपदी निवड; विराट, फॅफ यांनी केली घोषणा
''महेंद्रसिंग धोनीची खेळाडू म्हणून ही शेवटची आयपीएल स्पर्धा आहे. आतापर्यंत आम्हाला हे माहित्येय, परंतु तो सर्वस्वी त्याचा निर्णय असणार आहे. त्याने अद्यापतरी व्यवस्थापनाशी या संदर्भात अधिकृत चर्चा केलेली नाही. तो चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी खूप मोठा उत्सव असेल, परंतु त्याचवेळी धोनीला घरच्या मैदानावर शेवटचं खेळताना पाहताना सर्वांना दुःख होईल,''असे CSK च्या अधिकाऱ्याने insidesport शी बोलताना सांगितले.
आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून धोनीने CSK चं नेतृत्व सांभाळलं आहे. मागील पर्वात धोनीने कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवले होते, परंतु मध्यंतरानंतर धोनीने पुन्हा ही जबाबदारी स्वतःकडे घेतली. महेंद्रसिंग धोनीचं हे खेळाडू म्हणून शेवटचं आयपीएल वर्ष म्हटलं जात आहे. त्याच्यानंतर CSK च्या कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणे व ऋतुराज गायकवाड हे दोन पर्यात आहेत. बेन स्टोक्स हा प्ले ऑफच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. इंग्लंडचा कर्णधार १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मायदेशात परतणार आहे. स्टोक्सही CSK च्या कर्णधाराच्या शर्यतीत आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे वेळापत्रक...
- ३१ मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अहमदाबाद- सायंकाळई ७.३० वा. पासून
- ३ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई - सायंकाळी ७.३० वा. पासून
- ८ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा. पासून
- १२ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई - सायंकाळी ७.३० वा. पासून
- १७ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २१ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २३ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स कोलकाता - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २७ एप्रिल ० राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर - सायंकाळी ७.३० वा.पासून
- ३० एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून
- ४ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स, लखनौ - दुपारी ३.३० वा. पासून
- ६ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी ३.३० वा. पासून
- १० मे - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- १४ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई, - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २० मे - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली - दुपारी ३.३० वा. पासून
चेन्नई सुपर किंग्सचा संघ - महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, थिक्साना महिषा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, मुकेश चौधरी, समिरजीत सिंग, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, सुभ्रांषू सेनापती, शैक राशीद, निशांत सिंधू, कायले जेमिन्सन, अजय मंडल, भगत वर्मा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"