आम्हाला धोनी संपूर्ण स्पर्धेसाठी हवाय, त्यामुळे नो Risk...! असं का म्हणाले स्टीफन फ्लेमिंग?

आयपीएलच्या या पर्वात त्याने पाच इनिंग्जमध्ये आतापर्यंत २५५.८८च्या स्ट्राईक रेटने ८७ धावा चोपल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 04:10 PM2024-04-20T16:10:49+5:302024-04-20T16:11:13+5:30

whatsapp join usJoin us
CSK head coach Stephen Fleming revealed that MS Dhoni’s recovery from his knee injury has stopped him from batting for longer periods | आम्हाला धोनी संपूर्ण स्पर्धेसाठी हवाय, त्यामुळे नो Risk...! असं का म्हणाले स्टीफन फ्लेमिंग?

आम्हाला धोनी संपूर्ण स्पर्धेसाठी हवाय, त्यामुळे नो Risk...! असं का म्हणाले स्टीफन फ्लेमिंग?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Why MS Dhoni cannot bat longer? इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील महेंद्रसिंग धोनीची फटकेबाजी पाहून, हा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. जो धोनी ४ चेंडूंत मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याचे चित्र बदलू शकतो, जो धोनी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ९ चेंडूंत माहोल तयार करू शकतो... ज्याच्या येण्याची चाहते आतुरतेनं वाट पाहतात आणि ३-४ चेंडूंत तो कमाल करून जातोय. मग धोनी फलंदाजीला वरच्या क्रमांकावर का येत नाही? चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले, परंतु त्याने चाहत्यांच्या मनातील भीती वाढली आहे. 


लखनौविरुद्धच्या सामन्यात CSK च्या धडाधड विकेट पडत असताना धोनी आता येईल, आता येईल असे चाहत्यांना वाटत होते. पण, धोनी ८व्या क्रमांकावर आला अन् ९ चेंडूंत २८ धावा चोपून संघाला १७६ धावांपर्यंत पोहोचवले. आयपीएलच्या या पर्वात त्याने पाच इनिंग्जमध्ये आतापर्यंत २५५.८८च्या स्ट्राईक रेटने ८७ धावा चोपल्या आहेत. त्याचे उत्तुंग षटकार चाहत्यांचा आनंद द्वीगणित करणारे ठरत आहेत. मग, तो फलंदाजीला वरच्या क्रमांकावर आला तर...


सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी खुलासा केला की, महेंद्रसिंग धोनी त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झाल्याने त्याने दीर्घ कालावधीसाठी फलंदाजी करणे थांबवले आहे. फ्लेमिंग म्हणाले, की माही आयपीएल २०२४ मध्ये किती चांगली कामगिरी करत आहे, याबद्दल संघाला आश्चर्य वाटत नाही कारण तो प्री-सीझन शिबिरात चांगली फटकेबाजी करत होता. 


"हे प्रेरणादायी आहे, नाही का? यंदा सरावातही त्याची फलंदाजी अतिशय दमदार झाली आहे. तो जे करत आहे त्याबद्दल संघाला आश्चर्य वाटत नाही. काही वर्षांमध्ये त्याला त्याच्या गुडघ्यामध्ये समस्या आल्या होत्या आणि तो त्यातून बरा होत आहे, त्यामुळेच काही ठराविक चेंडूच तो चांगल्या प्रकारे खेळू शकतो,” असे क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत फ्लेमिंग यांनी सांगितले.


CSK ला संपूर्ण स्पर्धेसाठी धोनीची गरज आहे आणि त्याच्याबाबत कोणताही धोका पत्करू शकत नाही, यावर फ्लेमिंग यांनी भर दिला. “मला वाटते की प्रत्येकजण त्याला अधिक काळ पाहू इच्छितो, परंतु तेवढा वेळ योग्य आहे. आम्हाला स्पर्धेसाठी त्याची गरज आहे आणि २-३ षटकांचा कॅमिओ तो त्या जागेचा मालक आहे,” फ्लेमिंग असे पुढे म्हणाले. 

Web Title: CSK head coach Stephen Fleming revealed that MS Dhoni’s recovery from his knee injury has stopped him from batting for longer periods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.