IPL 2024, Why MS Dhoni cannot bat longer? इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील महेंद्रसिंग धोनीची फटकेबाजी पाहून, हा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. जो धोनी ४ चेंडूंत मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याचे चित्र बदलू शकतो, जो धोनी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ९ चेंडूंत माहोल तयार करू शकतो... ज्याच्या येण्याची चाहते आतुरतेनं वाट पाहतात आणि ३-४ चेंडूंत तो कमाल करून जातोय. मग धोनी फलंदाजीला वरच्या क्रमांकावर का येत नाही? चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले, परंतु त्याने चाहत्यांच्या मनातील भीती वाढली आहे.
लखनौविरुद्धच्या सामन्यात CSK च्या धडाधड विकेट पडत असताना धोनी आता येईल, आता येईल असे चाहत्यांना वाटत होते. पण, धोनी ८व्या क्रमांकावर आला अन् ९ चेंडूंत २८ धावा चोपून संघाला १७६ धावांपर्यंत पोहोचवले. आयपीएलच्या या पर्वात त्याने पाच इनिंग्जमध्ये आतापर्यंत २५५.८८च्या स्ट्राईक रेटने ८७ धावा चोपल्या आहेत. त्याचे उत्तुंग षटकार चाहत्यांचा आनंद द्वीगणित करणारे ठरत आहेत. मग, तो फलंदाजीला वरच्या क्रमांकावर आला तर...
सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी खुलासा केला की, महेंद्रसिंग धोनी त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झाल्याने त्याने दीर्घ कालावधीसाठी फलंदाजी करणे थांबवले आहे. फ्लेमिंग म्हणाले, की माही आयपीएल २०२४ मध्ये किती चांगली कामगिरी करत आहे, याबद्दल संघाला आश्चर्य वाटत नाही कारण तो प्री-सीझन शिबिरात चांगली फटकेबाजी करत होता.