ठळक मुद्देलवकरच IPL च्या १४ व्या हंगामाची होणार सुरूवातचेन्नई सुपरकिंग्सनं शेअर केला जबरदस्त व्हिडीओ
९ एप्रिलपासून देशात इंडियन प्रिमिअर लीग अर्थात IPL च्या १४ व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, आयपीएलचे बहुतांश सामने मुंबईत खेळवले जाण्याची शक्यता आहे. अशातच आता अनेक टीम्स देशातील विविध ठिकाणी दाखल होण्यासही सुरूवात होईल. चेन्नई सुपर किंग्सचा संघ २८ मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. आयपीएल २०२१ मधील त्यांचे सुरुवातीचे पाच सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. सध्या CSKचे सराव शिबिर चेन्नईत सुरू आहे. परंतु मुंबईत दाखल होण्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सनं जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्सचे खेळाडू आपल्याला मुंबई महाराष्ट्रात यायचं असल्यानं मराठीचे धडे घेताना दिसत आहेत.
चेन्नई सुपरकिंग्सनं आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्सचे खेळाडू महाराष्ट्रात यायचं असल्यानं महाराष्ट्राची भाषा मराठीमध्ये संवाद साधताना आणि शिकताना दाखवण्यात आले आहेत. दरम्यान आपले अनेक सामने मुंबईत असल्यानं आपण आपल्या सहकारी खेळाडूंना मराठी शिकवत असल्याचं चेन्नईचा खेळाडू ऋतुराज गायकवाड हा सांगताना दिसतोय. चेन्नई सुपरकिंग्सच्या या व्हिडीओला अनेकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. तसंच हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीसही उतरत आहे.
यापूर्वी बुधवारी चेन्नई सुपरकिंग्सनं आय़पीएलच्या १४ व्या हंगामासाठी नव्या जर्सीचं अनावरणही केलं. कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं आपल्या चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर करत ही जर्सी दाखवली. CSKच्या या जर्सीतून भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यात आली आहे. जर्सीच्या दोन्ही खांद्यावर भारतीय सैन्याचे प्रतिक असलेले चिन्ह लावण्यात आले आहे.
चेन्नई सुपरकिंग्सचे खेळाडू
चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन
लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- मोईन अली ( Moeen Ali) ७ कोटी, के गौतम ( K Gowtham) ९.२५ कोटी, चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujra) ५० लाख, हरिशंकर रेड्डी ( Harishankar Reddy) २० लाख, भगत वर्मा ( Bhagath Varma) २० लाख, हरि निशांत (Hari Nishanth) २० लाख.
Web Title: CSK IPL 2021 ruturaj Gaikwad teach marathi others players of team lot of matches to be played in mumbai wankhede stadium
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.