CSK नं शेअर केला खेळाडूंना रिटेन करण्यासंदर्भातील गेम प्लान? पोस्टमध्ये नेमकं दडलंय काय?

सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून CSK नं रिटेन खेळाडूंसंदर्भात हिंट दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:31 AM2024-10-30T11:31:13+5:302024-10-30T11:34:01+5:30

whatsapp join usJoin us
CSK IPL 2025 Retention List Cryptic Post Teases 5 Players Retained Signals MS Dhoni's Return | CSK नं शेअर केला खेळाडूंना रिटेन करण्यासंदर्भातील गेम प्लान? पोस्टमध्ये नेमकं दडलंय काय?

CSK नं शेअर केला खेळाडूंना रिटेन करण्यासंदर्भातील गेम प्लान? पोस्टमध्ये नेमकं दडलंय काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CSK IPL 2025 Retention List  Cryptic Post Teases 5 Players Retained : च्या मेगा लिलावाआधी या स्पर्धेत सहभागी असणारे सर्व १० संघ आपापल्या ताफ्यातील जुन्या भिडूंना रिटेन-रिलीज करण्याचा डाव खेळणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे  लोकप्रिय फ्रँचायझी संघ मेगा लिलावाआधी कोणत्या खेळाडूंवर डाव खेळणार? याबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. यात चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीची एक पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.  सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून CSK नं रिटेन खेळाडूंसंदर्भात हिंट दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.    

CSK नं खास इमोजी पोस्टसह शेअर केला खेळाडूंना रिटेन करण्यासंदर्भातील गेम प्लान? 
 
आयपीएल २०२५ मेगा लिलावाआधी फ्रँचायझी संघाला ६ खेळाडू रिटेन करता येणार आहे. यात ५ कॅप्ड खेळाडूंनाही पसंती देता येईल. याशिवाय २ अनकॅप्ड प्लेयरसह ४ कॅप्ड प्लेयर असा पर्यायही फ्रँचायझी संघासमोर असेल. चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या एक्स अकाउंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) काही खास इमोजी शेअर करत रिटेनचा गेम प्लान काय असेल? याची हिंट दिल्याचे दिसते. यातून संघ ५ किंवा सहा खेळाडू रिटेन करण्याचा विचार करत असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. 

 चाहत्यांनी लावला असा अंदाज

CSK संघानं सोशल मीडिया पोस्टमध्ये हेलिकॉप्टर, कीवी, घोडा आणि तलवार अशा इमोजीचा वापर केल्याचे दिसून येते. यावरुन चेन्नईचा संघ ऋतुराज गायकवाड, रवींद्र जाडेजा,मथीशा पथिराना, एमएस धोनी आणि रचिन रवींद्र या खेळाडूंना रिटेन करेल, असा अंदाज चाहते लावत आहेत. 

जाणून घ्या CSK च्या पोस्टमागची खरी गोष्ट 

२०२२ च्या मेगा लिलावाआधी देखील CSK नं सेम टू सेम याच इमोजी पोस्टसह लक्षवेधून घेतले होते. त्यावेळी जाडेजा, धोनी, मोइन अली आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंना संघाने रिटेन केले होते. जुनी पोस्ट नव्याने टाकल्यामुळे यात खेळाडू रिटेनसंदर्भात तथ्य नाही, अशा प्रतिक्रियाही उमटताना दिसते. 

Web Title: CSK IPL 2025 Retention List Cryptic Post Teases 5 Players Retained Signals MS Dhoni's Return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.