चेन्नई सुपर किंग्ससह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स यांची माघार; BCCI च्या प्लानिंगला बसला मोठा धक्का

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी बीसीसीआय जोरदार तयारी करत आहे. त्याचेळी बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा घेऊन येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:32 PM2023-01-23T18:32:52+5:302023-01-23T18:34:03+5:30

whatsapp join usJoin us
CSK, LSG, GT PULL OUT of Women IPL franchise race, Adani, Haldirams submit technical bids, BCCI to announce teams on January 25 | चेन्नई सुपर किंग्ससह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स यांची माघार; BCCI च्या प्लानिंगला बसला मोठा धक्का

चेन्नई सुपर किंग्ससह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स यांची माघार; BCCI च्या प्लानिंगला बसला मोठा धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी बीसीसीआय जोरदार तयारी करत आहे. त्याचेळी बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा घेऊन येत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून महिला आयपीएलला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.  महिला आयपीएलसाठी बीसीसीआयने मागवलेल्या प्रसारण हक्कासाठीच्या बोलीत वायकॉम १८ ने डिझनी स्टार आणि सोनीला मागे टाकून पाच वर्षांसाठी ९५१ कोटींची सर्वाधिक बोली लावली. महिला क्रिकेटसाठी ही खूप मोठी झेप मानली जात आहे. त्यात बीसीसीआयनेही आता महिला आयपीएल यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी बीसीसीआयने फ्रँचायझी खरेदीसाठी बिडींग मागवले होते.

महिला आयपीएलसाठी BCCI चा खास बदल; एका संघात ५ परदेशी खेळाडू खेळणार; ४ मार्चपासून थरार सुरू होणार

आयपीएलमधील यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्सने महिला आयपीएल संघ खरेदी करण्याच्या प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यांनी या प्रक्रियेसाठीची कागदपत्रे घेतली, परंतु मोक्याच्या क्षणी त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. CSK सह लखनौ सुपर जायंट्स व गुजरात टायटन्स  यांनीही महिला आयपीएल संघ खरेदी प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्याचवेळी अदानी, हलदिराम आणि टोरेंट फार्मा या मोठ्या कंपन्यांची एन्ट्री झाली आहे. CSKचे सीईओ काशी विश्वनाथन सध्या दक्षिण आफ्रिकेत SAT20 लीगसाठी आहेत आणि ते महिला आयपीएल फ्रँचायझी खरेदी प्रक्रियेपासून दूर आहेत. 

पंजाब किंग्सने महिला आयपीएल खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स यांनी महिला फ्रँचायझीसाठी कागदांची पूर्तता केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे मालकी हक्क असलेल्या JSWने GMR समुहासह संयुक्तरित्या बोली लावली आहे. व्यावसायिक निर्णय असल्याचे CSK ने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी चेन्नईतील श्रीराम ग्रुप, निलगिरी ग्रुप व ए डब्लू काटकुरी ग्रूप यांनी चेन्नई फ्रँचायझीसाठी उत्सुकता दाखवली आहे. बीसीसीआय २५ तारखेला महिला फ्रँचायझींची घोषणा करण्याची शक्यता आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: CSK, LSG, GT PULL OUT of Women IPL franchise race, Adani, Haldirams submit technical bids, BCCI to announce teams on January 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.