चेन्नई सुपर किंग्सचा कप्तान महेंद्रसिंह धोनीसाठी यंदाची आयपीएल शेवटची स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच धोनी निवृत्त होणार य़ा शक्यतेने धोनीला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. परंतु यंदाही धोनी आयपीएल २०२४ खेळणार आहे. परंतु चेन्नईच्या टीमला भविष्याचे वेध लागले आहेत. आतापासूनच चेन्नईचा संघ कर्णधार आणि उपकर्णधाराच्या शोधकार्यात लागला आहे.
सीईओ विश्वनाथन यांनी याचे स्पष्टपणे संकेत दिले आहेत. धोनी आणि मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंग पुढील कर्णधार आणि उपकर्णधार निवडणार आहेत, असे स्पष्ट निर्देश संघाचे मालक एन श्रीनिवासन यांनी दिले असल्याचे विश्वनाथन यांनी म्हटले आहे.
यानुसार धोनीच आपला उत्तराधिकारी कोण असेल ते निवडणार आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने पाच आय़पीएल स्पर्धा जिंकल्या आहेत. धोनीच्या निकटवर्तीयांनी धोनी आणखी दोन आयपीएल तरी खेळेल एवढा फिट असल्याचे म्हटले होते. परंतु सीएसकेची तयारी पाहता धोनीची ही कप्तान म्हणून अखेरची आयपीएल असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात होत आहे.
कर्णधार आणि उपकर्णधार नियुक्तीबद्दल सध्या बोलू नका, असे श्रीनिवासन यांनी आमच्यासोबत झालेल्या चर्चेत म्हटले आहे. याबाबत प्रशिक्षक (स्टीफन फ्लेमिंग) आणि कर्णधार (धोनी) यांना निर्णय घेऊ द्या. ते निर्णय घेतील आणि मला सांगतील, मग मी तुम्हा सर्वांना सांगेन. कर्णधार आणि प्रशिक्षक निर्णय घेतील, मग ते आम्हाला सूचना देतील, तोपर्यंत आम्ही सर्व यावर काहीही बोलणार नाही, असे विश्वनाथन म्हणाले.