इंडियन प्रीमिअर लीगला 2008मध्ये सुरुवात झाली. तेव्हा प्रत्येक संघांनी स्थानिक स्टार खेळाडूला आपापल्या संघात घेणे प्राधान्याचे समजले. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सनं सौरव गांगुली, मुंबई इंडियन्सनं सचिन तेंडुलकर, दिल्ली डेअरडेव्हिल्सनं वीरेंद्र सेहवागला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. पण, याला चेन्नई सुपर किंग्स संघ अपवाद ठरला. तामिळनाडूच्या स्टार यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला संघात न घेता CSKनं रांचीच्या महेंद्रसिंग धोनीला आपल्या ताफ्यात घेतले. त्यामुळे दिनेश कार्तिक प्रचंड नाराज झाला होता. CSK नं आपल्या हृदयात खंजीर खुपसला, असं त्याला त्यावेळी वाटले होते.
Crizbuzzशी बोलताना कार्तिकनं CSK वर गंभीर आरोप केले. तो म्हणाला,''2008मध्ये मी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होतो आणि तेव्हा आयपीएलचा लिलाव सुरू होता. तामिळनाडू राज्यातून देशाचे प्रतिनिधित्व करणारा मी तेव्हा एकमेव खेळाडू होतो. त्यामुळे स्थानिक संघ CSK माझी निवड नक्की करतील, याची मला खात्री होती. फक्त कर्णधारपद माझ्याकडे असेल की नाही, याबाबत मनात साशंकता होती. पण, CSKनं धोनीला 1.5 मिलियनमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. त्यावेळी धोनी माझ्या बाजूलाच बसला होता आमि त्यानं मला ही बातमी सांगितलीही नाही.''
2008पासून कार्तिक CSK कडून खेळायला मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. या कालावधीत त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात लायन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स संघांचे प्रतिनिधित्व केले. तो पुढे म्हणाला,''CSKनं निवड केल्याचं कदाचित धोनीलाही तेव्हा माहित नसावं, परंतु संघाचा त्या निर्णयानं हृदयात खंजीर खुपसल्यासारखे वाटले. तेव्हा मी विचार केला, ते मला नंतर संघात घेतील. पण, 13 वर्ष झाली माझी प्रतीक्षा संपलेली नाही.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
पाकिस्तानी फलंदाज देशासाठी खेळतात, भारतीय स्वतःसाठी; पाकचा माजी कर्णधार बरळला
मोठा निर्णय : 'युनिव्हर्स बॉस' Chris Gayleच्या मदतीला किंग्स इलेव्हन पंजाब धावला
'Sex Video'मुळे महिला खेळाडूचं आयुष्य झालं होतं उद्ध्वस्त; तीन दिवस घरातच होता मृतदेह