चेन्नई सुपर किंग्सचे ( CSK) दोन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील 11 असे एकूण 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाच्या वेळापत्रकाला विलंब झाला. संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आयपीएलचा सलामीचा सामना खेळणार की नाही, यावरही बीसीसीआयनं चर्चा सुरू होती. पर्याय म्हणून बीसीसीआयनं विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाची निवड केली होती. पण, आता चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेता मुंबई इंडियन्स यांच्यात सलामीच्या सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआय लवकरच आता वेळापत्रक जाहीर करणार आहे.
Big Blow : सुरेश रैनापाठोपाठ हरभजन सिंगचीही IPL2020मधून माघार; CSKला मोठा धक्का
दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफच्या सदस्य 14 दिवासांच्या क्वारंटाईन कालावधीत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य सदस्यांची गुरुवारी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात या सर्वांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून चेन्नई उद्यापासून सरावाला सुरुवात करणार आहे. चेन्नईच्या सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे आता बीसीसीआयची चिंता मिटली आहे आणि ते आता वेळापत्रक जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.