2000 runs + 100 Wickets in IPL - विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा हे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत अग्रक्रमांकावर आहेत, तर गोलंदाजीत लसिथ मलिंगा, ड्वेन ब्राव्हो या खेळाडूंना अमित मिश्रा व पीयुष चावला यांनी कडवी टक्कर दिली आहे. पण, आयपीएलमध्ये बॅट अन् बॉल दोन्हींनी कमाल करणारे फार कमीच आहेत. त्यात २०००+धावा व १०० विकेट्स असा पराक्रम तर एकाच खेळाडूला करता आला आहे आणि तो MS Dhoni च्या चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) सदस्य आहे.
आयपीएलमध्ये १००० + धावा व ५० + विकेट्स
- शेन वॉटसन - ३८७४ धावा व ९२ विकेट्स
- कायरॉन पोलार्ड - ३२६८ धावा व ६५ विकेट्स
- जॅक कॅलिस - २४२७ धावा व ६५ विकेट्स
- रवींद्र जडेजा - २३८६ धावा व १२७ विकेट्स
- आंद्रे रसेल - १७०० धावा व ७२ विकेट्स
- ड्वेन ब्राव्हो - १५३७ धावा व १६७ विकेट्स
- इरफान पठाण - ११३९ धावा व ८० विकेट्स
- कृणाल पांड्या - ११४३ धावा व ५१ विकेट्स
१००० + धावा व १०० + विकेट्स
- रवींद्र जडेजा - २३८६ धावा व १२७ विकेट्स
- ड्वेन ब्राव्हो - १५३७ धावा व १६७ विकेट्स
२००० + धावा व १०० + विकेट्स
- रवींद्र जडेजा - २३८६ धावा व १२७ विकेट्स
- आयपीएल २०२२ साठी चेन्नईने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाला पहिली पसंत दिली आहे. त्याच्यासाठी फ्रँचायझीने १५ कोटी राखून ठेवले, तर कर्णधार धोनीला १२ कोटींत रिटेन केले. ऋतुराज गायकवाडसाठी ६ तर मोईन अलीसाठी ८ कोटी फ्रँचायझीने मोजले.