सीएसके-आरसीबी लढत चुरशीची होणार

चेन्नई संघाचा गेल्या दोन वर्षांत आयपीएलमध्ये सहभाग नव्हता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:13 AM2018-04-25T00:13:00+5:302018-04-25T00:13:00+5:30

whatsapp join usJoin us
CSK-RCB fight will be tough | सीएसके-आरसीबी लढत चुरशीची होणार

सीएसके-आरसीबी लढत चुरशीची होणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बेंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) आणि चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) संघादरम्यान इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दोन वर्षांनंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बुधवारी लढत होणार आहे.
चेन्नई संघाचा गेल्या दोन वर्षांत आयपीएलमध्ये सहभाग नव्हता. अशा स्थितीत क्रिकेट चाहत्यांना आयपीएलमधील सर्वांत चर्चेत असलेली चुरस अनुभवण्याची संधी मिळाली नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाची आरसीबीविरुद्धची एकूण कामगिरी १३-७ अशी आहे, पण चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सात सामन्यांपैकी उभय संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत तर एका सामन्याचा निकाल शक्य झाला नाही.
चेन्नई संघाने यंदाच्या मोसमात पुनरागमन करताना आरसीबीच्या तुलनेत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत जे पाच सामने त्यापैकी चार सामने जिंकले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पाच सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकले. गेल्या आठवड्यात गृहमैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आरसीबी संघ लय कायम राखण्यास उत्सुक आहे.
कोहली व डिव्हिलियर्सच्या जोडीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २३६१ धावा फटकावल्या आहेत. त्यांचा क्रमांक कोहली व गेल यांच्यानंतर येतो. त्यांच्या नावावर २७८७ धावांची नोंद आहे. शिखर धवन व डेव्हिड वॉर्नर या जोडीच्या नावावर २३५७ धावा आहेत.
क्विंटन डिकाकने आतापर्यंत ११२ धावा फटकावल्या आहेत. तो मोठी खेळी करण्यास उत्सुक आहे तर मनन व्होराकडूनही संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याने गेल्या लढतीत केवळ एक धाव केली होती.
चेन्नईच्या मजबूत फलंदाजी क्रमाविरुद्ध आरसीबीला आपल्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यांच्या गोलंदाजांनी गृहमैदानावर दोनदा २०० पेक्षा अधिक धावा बहाल केल्या आहेत.
युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंनी अनुक्रमे पाच व चार बळी घेतले आहेत. या दोघांना बुधवारच्या लढतीत चांगली कामगिरी करावी लागले. कारण चेन्नई संघ यंदाच्या मोसमात फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. चेन्नईचे १० फलंदाज फिरकीपटूंचे बळी ठरले आहे. त्यांनी फिरकीपटूंविरुद्ध प्रतिषटक ७.७० च्या सरासरीने धाव फटकावल्या आहे. आरसीबीचा अष्टपैलू ख्रिस व्होक्स शानदार फॉर्मात आहे. त्याने ८ बळी घेतले आहेत. उमेश यादवनेही ८ फलंदाजांना माघारी परतवले आहे. (वृत्तसंस्था)

एबी डिव्हिलियर्सला गवसलेला सूर आरसीबी संघासाठी शुभवार्ता आहे. गेल्या लढतीत त्याने ३९ चेंडूंना सामोरे जाताना ९० धावा फटकावित आरसीबी संघाला दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध सहज विजय मिळवून दिला होता. त्याने शानदार खेळी करताना एकट्याच्या बळावर १७५ धावांचे लक्ष्य दोन षटके शिल्लक राखून गाठून दिले. कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५७ व मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद ९२ धावा केल्या होत्या. त्यामुळे आरसीबी संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली.

चेन्नई संघाबाबत चर्चा केली तर शेन वॉटसन शानदार फॉर्मात आहे. त्याने रॉयल्सविरुद्ध ५७ चेंडूंमध्ये १०६ धावा फटकावल्या होत्या. संघातर्फे सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या व सर्वाधिक बळी घेणाºया खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. अंबाती रायडूही कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहे. त्याने आतापर्यंत २०१ धावा केल्या आहेत. सुरेश रैना व ड्वेन ब्राव्हो यांनी काही चांगल्या खेळी केल्या आहे. ते चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत.
 

Web Title: CSK-RCB fight will be tough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.