Join us  

CSK shares fall : Suresh Rainaला न घेण्याचा चेन्नई सुपर किंग्सला बसला मोठा फटका?; CSKच्या फॅन्सनीच दाखवला इंगा! 

CSK shares fall : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) संतुलित संघ निवडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 4:39 PM

Open in App

CSK shares fall : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) संतुलित संघ निवडला. पण, काही खेळाडूंच्या निवडीवरून  CSK चे फॅन्स नाराज दिसले आणि त्याचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर झाला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचे शेअर मागील दोन दिवसांत १०-१५ टक्क्यांनी घसरले. चेन्नईने आयपीएल लिलावातून उभा केलेल्या संघाला भागधारकांनी ( shareholders ) ठेंगा दाखवला आहे.  

मागील महिन्यात चेन्नईच्या शेअर्सनी GREY MARKET मध्ये २१५-२२५ असा भाव घेतला होता आणि त्यांची मार्केट कॅप ७६०० कोटीपर्यंत पोहोचली होती. ७ कोटींचा टप्पा गाठणारी ही भारतातील पहिली SPORTS UNICORN कंपनी ठरली होती.  पण, आता आयपीएल ऑक्शनननंतर  CSKचे शेअर्स १८०-१९० या किंमतीपर्यंत घसरले आहेत. काही रिपोर्टनुसार जवळपास १ लाख लोकांनी शेअर्स विकायला काढले आहेत. 

मार्केट तज्ज्ञांनी सांगितले की,''चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा वयस्कर खेळाडूंवर बोली लावली आणि जे युवा खेळाडू घेतले त्यांच्याबाबत अनेकांना काहीच माहित नाही.  त्यामुळे त्यांच्या शेअर्सवर परिणाम जाणवला. त्यांनी निवडलेला संघ हा विजयी ठरू शकत नाही, असे मार्केटला वाटते. त्यामुळेच त्यांचे शेअर्स घसरले आहेत.''

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी),  केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर  ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख). 

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सआयपीएल लिलावशेअर बाजार
Open in App