Join us  

'टाईमपास' महागात पडणार, MS Dhoni वर फायनलसाठी बंदी येणार? कॅप्टन कूलवर टीका

IPL 2023 Final :  महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने दहाव्यांदा आयपीएल २०२३ फायनलमध्ये प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 3:30 PM

Open in App

IPL 2023 Final :  महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने दहाव्यांदा आयपीएल २०२३ फायनलमध्ये प्रवेश केला. ४१ वर्षीय धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याची चर्चा आहे आणि त्यात त्याने फायनल गाठून चाहत्यांना जेतेपदाचं गिफ्ट देण्यासाठी कंबर कसली आहे. पण, CSK च्या कर्णधारावर बंदी येण्याची शक्यता आहे आणि त्याला IPL Final खेळता येणार नाही. त्यामुळे पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी उचलताना कदाचित धोनी दिसणार नाही. २८ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही फायनल होणार आहे.  

महेंद्रसिंग धोनीने क्वालिफायर १ सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध जाणीवपूर्वण वेळ वाया घालवला आणि अम्पायर्ससोबत हुज्जत घातली. त्यामुळे त्याच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते. डावाच्या १६व्या षटकात ही घटना घडली जेव्हा मथिशा पाथिराणाला अम्पायरने त्याचे दुसरे षटक टाकू दिले गेले नाही. लंकेचा वेगवान गोलंदाज ९ मिनिटांचा ब्रेक घेऊन मैदानाबाहेर गेला होता. जेव्हा तो गोलंदाजीकडे परतला, तेव्हा पंचांनी त्याला थांबवले आणि पाथिरानाने ब्रेकनंतर मैदानावर निर्धारित वेळ पूर्ण केली नाही, असे त्यांनी धोनीला सांगितले.

त्यानंतर, धोनीने पाच मिनिट अम्पायर्ससोबत युक्तिवाद केला ज्यामुळे समालोचन कक्षात असलेल्या सुनील गावस्कर आणि सायमन डॉल यांनी नाराजी व्यक्त केली. पंचांशी ५ मिनिटांचा तो वाद अनावश्यक होता. दुसर्‍या गोलंदाजाला गोलंदाजी देण्याऐवजी खेळ थांबवण्याचं काम  त्याने केले. त्याबाबत तो सामन्याच्या शेवटी खंत व्यक्त करू शकतो,” असे डॉल ऑन एअर म्हणाले. विनाकारण उशीर केल्याबद्दल पंच धोनीवर कारवाई करतील की नाही हे स्पष्ट नाही.

तू चेपॉकवर पुन्हा येऊन खेळशील? MS Dhoni- मी CSKसाठी नेहमीच उपलब्ध राहिन, पण... 

मथिशा पथिराणाला गोलंदाजी करण्यापासून अम्पायरने रोखले, MS Dhoni ने वाचा काय केले

ऋतुराजच्या अविश्वसनीय कॅचने सामना फिरला, GTचा आत्मविश्वास ठेचला, Video

दोषी आढळल्यास, CSK कर्णधाराला दंड किंवा बंदी घातली जाऊ शकते. चेन्नई सुपर किंग्सने कालच्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सवर १५ धावांनी विजय मिळवला आणि आयपीएल २०२३ ची अंतिम फेरी गाठली. 

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स
Open in App