चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) IPL2020मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals) पराभव पत्करावा लागला. संयमी सुरुवातीनंतर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांनी दमदार खेळ करताना दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानंतर DCच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना CSKवर सातत्यानं दडपण टाकले. MS Dhoniचा फलंदाजीला येण्याचा क्रम पुन्हा चुकल्यानं CSKच्या फलंदाजांवरील दडपण अधिक वाढत गेले आणि त्याचाही फायदा दिल्लीला झाला. श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) आपल्या नेतृत्वगुणाचा योग्य वापर करताना CSKला हार मानण्यास भाग पाडले. DC vs CSK Latest News & Live Score
महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video
क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग
CSKने संघात एक बदल केला असून लुंगी एनगिडीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूड याला संधी दिली आहे. DCच्या संघातही दोन बदल पाहायला मिळाले. दुखापतग्रस्त आर अश्विनच्या जागी अमित मिश्राला,तर मोहित शर्माच्या जागी आवेश खान याला संधी दिली आहे. DC ओपनर शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यांनी पॉवर प्लेमध्ये संयमी खेळ केली. पॉवर प्लेनंतर पृथ्वी व शिखर यांनी गिअर बदलला आणि दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पृथ्वीनं IPL2020मधील पहिले अर्धशतक 35 चेंडूत पूर्ण केले. पण 11 व्या षटकात ही जोडी पीयूष चावलानं तोडली. त्यानं धवनला ( 35) माघारी पाठवलं. पाठोपाठ चावलानं 64 धावांची खेळी करणाऱ्या पृथ्वीलाही बाद केलं. यानंतर CSKच्या गोलंदाजांनी सामन्यात कमबॅक केले. DC vs CSK Latest News & Live Score
महेंद्रसिंग धोनीनं केली सुरेश रैनाशी बरोबरी; दोघांच्याच नावावर आहे हा विक्रम
IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली
शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर
धोनीनं त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करताना DCच्या धावसंख्येवर लगाम लावला. 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धोनीनं यष्टिमागे कमाल केली. त्यानं पृथ्वी शॉला यष्टिचीत करून माघारी जाण्यास भाग पाडले. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ताबडतोड अर्धशतकी भागीदारी केली. सॅम कुरननं 19व्या षटकात सुरेख गोलंदाजी करताना DCच्या धावगतीला वेसण घातलं. त्यानं अय्यरला ( 26) बाद केले. यष्टिंमागे धोनीनं अफलातून झेल घेतला. दिल्लीनं 20 षटकांत 3 बाद 175 धावा केल्या. अखेरच्या षटकात 14 धावा चोपल्या गेल्या. रिषभनं 25 चेंडूंत नाबाद 37 धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीनं सुपर स्टम्पिंग नंतर अफलातून झेल घेतला. DC vs CSK Latest News & Live Score