नवी दिल्ली - आयपीएलमध्ये सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून लौकिक असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची यंदाच्या हंगामातील वाटचाल काहीशी अडखळती झाली आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीत विजय मिळवून झोकात सुरुवात करणाऱ्या धोनीच्या या संघाला नंतर झालेल्या दोन लढतीत पराभव पत्करावा लागला आहे. काल दिल्लीविरुद्ध झालेल्या लढतीत तर चेन्नईला ४४ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. सलग दुसऱ्या सामन्यात चैन्नईच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यावरून भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपरकिंग्सला टीकेचे लक्ष्य केले आहे.वीरूने गमतीदार ट्विट करत चेन्नईच्या फलंदाजांना टोला लगावला आहे. सध्या चेन्नईचे फलंदाज चालत नाही आहेत. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्यांना ग्लुकोज लावून आणावे लागेल, असा चिमटा वीरेंद्र सेहवागने काढला आहे. काल दिल्लीविरुद्धच्या लढतीत १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे संघाला २० षटकांत ७ बाद १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली होती.
CSKसाठी गुडन्यूज! पुढील सामन्यात खेळणार ‘हा’ स्टार फलंदाज
चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) संघाने शुक्रवारी Indian Premier League (IPL 2020) मध्ये सलग दुसरा पराभव पत्करला. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांच्या फलंदाजांना नियोजनबद्ध खेळ करण्यात यश आले नाही. एकटा फाफ डूप्लेसिस सोडला, तर बाकी कोणालाही निर्धाराने खेळता आले नाही. त्यात त्यांना आपल्या अनुभवी फलंदाजाची कमतरता फार भासली. मात्र आता त्या स्टार फलंदाजाचे पुनरागमन होत असून चेन्नई आता लवकरच विजयी मार्गावर परतेल असा विश्वास चाहत्यांना आहे. गेल्या दोन सामन्यांत दुखापतीमुळे संघाबाहेर बसलेला स्टार फलंदाज अंबाती रायुडू (Ambati Rayudu) पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीविरुद्ध सीएसकेला रायुडूची कमतरता खूप भासली.