महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) काय चीज आहे, याची प्रचीती पुन्हा एकदा विशाखापट्टणम येथे पाहायला मिळाली. इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४चा दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यातला सामना येथे खेळवला गेला. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील DC ने हा सामना जिंकला जरी असला तरी CSK च्या MS Dhoni ची क्रेझ पाहायला मिळाली.... शिवम दुबेची विकेट पडताच कॅप्टन कूल धोनी मैदानावर येणार यानेच स्टेडियम दणाणून गेले. पिवळी लाट जर्सीवर आली होती आणि त्यात एक मिस्ट्री गर्ल फेमस झाली...
डेव्हिड वॉर्नर ( ५२), रिषभ पंत ( ५१) व पृथ्वी शॉ ( ४३ ) या आघाडीच्या तीन फलंदाजांनी दिल्लीला ५ बाद १९१ धावांपर्यंत पोहोचवले. मथिशा पथिरानाने ३ विकेट्स घेत मधल्या षटकांत दिल्लीला बॅकफूटवर फेकले होते, परंतु रिषभने अर्धशतक झळकावून चेन्नईला संकटात टाकले. चेन्नईची सुरुवात काही खास झाली नाही. अजिंक्य रहाणे ( ४५ ) व डॅरील मिचेल ( ३४) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून चेन्नईचा डाव सावरला. इम्पॅक्ट प्लेअऱ शिवम दुबे ( १८) अपयशी ठरला. पण, त्याच्या विकेटनंतर धोनी मैदानावर येताच जोरदार जल्लोष झाला. या जल्लोषात एक मिस्ट्री गर्ल व्हायरल झाली...
खलीलनं धोनीचं दडपण एवढं घेतलं की १८व्या षटकात ३ वाईड चेंडू फेकले. त्याने १२ धावा दिल्याने CSK ला शेवटच्या २ षटकांत ४६ धावा करायच्या होत्या. मुकेशने १९व्या षटकात टिच्चून मारा करताना केवळ ५ धावा देऊन चेन्नईचा पराभव निश्चित केला. ६ चेंडूंत ४१ धावांची गरज असताना धोनीने दोन चौकार व दोन षटकार खेचून २० धावा केल्या. पण, १९व्या षटकातील धोनीने खेळलेले ३ डॉट चेंडू चेन्नईला महागात पडले...
ती मिस्ट्री गर्ल कोण?
आयशा खान असे त्या चाहतीचे नाव आहे. ती अभिनेत्री, मॉडेल आणि इन्फ्युएन्सर आहे. मुंबईतील या अभिनेत्रीने बिग बॉस सीझन १७ मधून आपली ओळख निर्माण केली. आयशाने टेलिव्हिजन शो 'कसौटी जिंदगी के' मध्ये ज्युनियर कलाकार म्हणून पदार्पण केले. तिने बालवीर रिटर्न्स या शोद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले आणि तेलुगूमध्ये मुखचित्रम या कायदेशीर नाटकाद्वारे चित्रपटात पदार्पण केले होते. रोहित शेट्टीने होस्ट केलेल्या खतरों के खिलाडी सीझन १४ मध्येही ती दिसणार आहे.
Web Title: CSK vs DC Live : Indian actress, model, and influencer Ayesha Khan cheering for MS Dhoni at vizag
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.