इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४चा दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यातला सामना Vizag येथे खेळवला गेला. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील DC ने हा सामना २० धावांनी जिंकला. CSK च्या MS Dhoni ची क्रेझ पाहायला मिळाली.... शिवम दुबेची विकेट पडताच कॅप्टन कूल धोनी मैदानावर येणार यानेच स्टेडियम दणाणून गेले. दिल्ली कॅपिटल्सच्या १९१ धावांच्या प्रत्युत्तरात चेन्नईला १७१ धावाच करता आल्या. या सामन्यात रिषभ पंत ( Rishabh Pant) व MS Dhoni चा एकहाती षटकार पाहायला मिळाला आणि कोणाचा षटकात बेस्ट याची चर्चा रंगली...
MS Dhoni ची दिवानी! 'मिस्ट्री गर्ल' Vizag ला पोहोचली अन् कॅमेरामनची नजर तिच्यावर पडली
डेव्हिड वॉर्नर ( ५२), रिषभ पंत ( ५१) व पृथ्वी शॉ ( ४३ ) या आघाडीच्या तीन फलंदाजांनी दिल्लीला ५ बाद १९१ धावांपर्यंत पोहोचवले. मथिशा पथिरानाने ३ विकेट्स घेत मधल्या षटकांत दिल्लीला बॅकफूटवर फेकले होते, परंतु रिषभने अर्धशतक झळकावून चेन्नईला संकटात टाकले. चेन्नईची सुरुवात काही खास झाली नाही. अजिंक्य रहाणे ( ४५ ) व डॅरील मिचेल ( ३४) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून चेन्नईचा डाव सावरला. इम्पॅक्ट प्लेअऱ शिवम दुबे ( १८) अपयशी ठरला. पण, त्याच्या विकेटनंतर धोनी मैदानावर येताच जोरदार जल्लोष झाला.