चेन्नई : सॅम बिलिंग्ज आणि शेन वॉटसन यांच्या वादळी फलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने आज येथे इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा ५ गडी आणि एक चेंडू राखून पराभव करीत सलग दुसरा विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी दिलेले २०३ धावांचे दिलेले कठीण लक्ष्य चेन्नई सुपर किंग्जने १९.५ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून सॅम बिलिंग्जने सर्वाधिक २३ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५६ धावा केल्या. शेन वॉटसनने १९ चेंडूंत ३ चौकार, ३ षटकारांसह ४२, अम्बाती रायुडूने २६ चेंडूंत ३ चौकार, २ षटकारांसह ३९, आणि धोनीने २८ चेंडूंत २५ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून टॉम कुरेनने २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, आंद्रे रसेलच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने ६ बाद २०२ धावा फटकावल्या.
आयपीएलमध्ये आपल्या सर्वोत्तम खेळीदरम्यान आंद्रे रसेलने ३६ चेंडूंतच ११ षटकार आणि एका चौकारासह नाबाद ८८ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार दिनेश कार्तिक (२६) याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ७.४ षटकांतच ७६ धावांची भागीदारी केली. रॉबिन उथप्पानेदेखील १६ चेंडूंत २९ धावांची खेळी केली. रसेल याची सात अथवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना टी-२० मधील ही सर्वोत्तम खेळी ठरली.
रसेलच्या वादळीने खेळीच्या बळावर केकेआरने अखेरच्या ५ षटकांत ७९ धावांचा पाऊस पाडला. चेन्नई सुपर किंग्जकडून शेन वॉटसन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ३९ धावा दिल्या. ड्वेन ब्राव्हो खूप महागडा ठरला. त्याने ३ षटकांत ५० धावा दिल्या.
>संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स : २0 षटकांत ६ बाद २0२.
(आंद्रे रसेल नाबाद ८८, रॉबिन उथप्पा २९, दिनेश कार्तिक २६, ख्रिस लिन २२. शेन वॉटसन २/३९, जडेजा १/१९, शार्दुल १/३७, हरभजन १/११).
चेन्नई सुपर किंग्ज : १९.५ षटकांत ५ बाद २0५.
(सॅम बिलिंग्ज ५६, शेन वॉटसन ४२, अम्बाती रायुडू ३९, धोनी २५. टॉम कुरेन २/३९. पीयूष चावला १/४९, सुनील नारायण १/१७, कुलदीप यादव १/२७).
Web Title: CSK vs KKR, IPL 2018: Superb Victory of Chennai Super Kings' Kolkata Knight Riders
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.