CSK vs KKR Latest News : वाढदिवसाला ड्वेन ब्राव्होनं केला मोठा पराक्रम, KKRच्या फलंदाजांची उडवली झोप 

CSK vs KKR Latest News :CSKकडून शार्दूल ठाकूर, सॅम कुरन, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २, तर ड्वेन ब्राव्होनं तीन विकेट्स घेतल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: October 7, 2020 09:39 PM2020-10-07T21:39:04+5:302020-10-07T21:39:30+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs KKR Latest News : Birthday boy DJ Bravo becomes the second foreigner to take 150 IPL wickets in IPL | CSK vs KKR Latest News : वाढदिवसाला ड्वेन ब्राव्होनं केला मोठा पराक्रम, KKRच्या फलंदाजांची उडवली झोप 

CSK vs KKR Latest News : वाढदिवसाला ड्वेन ब्राव्होनं केला मोठा पराक्रम, KKRच्या फलंदाजांची उडवली झोप 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगत आहे. गुणतक्त्यात ( Point Table) KKR व CSK प्रत्येकी 4 गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे. CSKची कामगिरी समाधानकारक झाली नसली तर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी एकहाती सामना जिंकला. त्यामुळे CSKचे मनोबल उंचावले आहे. दुसरीकडे KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक याला संघाची घडी नीट बसवता येत नाही. इयॉन मॉर्गनच्या फलंदाजी क्रमवारीवरून त्याच्यावर टीका होत आहे, शिवाय सुनील नरीनचा फॉर्म हा संघासाठी चिंतेची बाब बनली होती. त्यामुळे KKRने आज त्यांचा फलंदाजांचा क्रमच बदलला. पण, त्याचा काही उपयोग झाला असे दिसले नाही. 

कार्तिकनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाइट रायडर्सनं यापूर्वी मे २०१५ मध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच ६९ सामन्यांनंतर KKRनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( २०१५) कोलकातानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि कोलकातानं तो सामना १५ धावांनी जिंकला. या सामन्यात पीयूष चावला ( ४/३२) मॅन ऑफ दी मॅच ठरला होता. 

आजच्या सामन्यात सुनीन नरीनच्या जागी राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ३७ धावा जोडल्या. शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) गिलला माघारी पाठवलं. त्यानंतर आलेल्या नितिश राणाला आज पहिला सामना खेळणाऱ्या कर्ण शर्मानं बाद केलं. राहुल त्रिपाठीनं दमदार खेळ करताना अर्धशतक पूर्ण केलं. सलामीला अपयशी ठरत असलेल्या सुनील नरीनला चौथ्या क्रमांकावर येऊनही मोठी खेळी करता आली नाही. क्षेत्ररक्षणात चपळ असलेल्या रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) सीमारेषेवर डाईव्ह घेत नरीनचा झेल टिपला, परंतु हात बाऊंड्री लाईनला लागेल हे लक्षात येताच त्यानं तो फॅफ ड्यू प्लेसिसकडे सोपवला आणि KKR ला धक्का दिला. इयॉन मॉर्गन (७) बाऊन्सरवर झेलबाद झाला. आंद्रे रसेलही ( २) धावांवर माघारी परतला. शार्दूल ठाकूरच्य स्लोवह बाऊन्सरवर त्याचा झेल धोनीनं टिपला.


एकट्या राहुल त्रिपाठीनं KKRची खिंड लढवली. त्यानं ५१ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८१ धावा चोपल्या.  ड्वेन ब्राव्होनं १७ व्या षटकात शेन वॉटसनकरवी त्याला झेलबाद केले. दिनेश कार्तिकचे अपयश याही सामन्यात पाहायला मिळाले. CSKकडून शार्दूल ठाकूर, सॅम कुरन, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २, तर ड्वेन ब्राव्होनं तीन विकेट्स घेतल्या. KKRला २० षटकांत सर्वबाद १६७ धावा करता आल्या. 

या कामगिरीसह ब्राव्होनं एका विक्रमाला गवसणी घातली. IPLमध्ये १५० विकेट्स घेणारा तो दुसरा परदेशी गोलंदाज ठरला.
लसिथ मलिंगा  - १७० विकेट्स
अमित मिश्रा - १६० विकेट्स
पीयूष चावला - १५६ विकेट्स
हरभजन सिंग - १५० विकेट्स
ड्वेन ब्राव्हो - १५० विकेट्स 
 

Web Title: CSK vs KKR Latest News : Birthday boy DJ Bravo becomes the second foreigner to take 150 IPL wickets in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.