दुबई : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर नितीश राणाच्या ताबडतोड फलंदाजीच्या जोरावर केकेआरने चेन्नईपुढे १७३ धावांचे आव्हान दिले होते.
केकेआरने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला चेन्नईचे सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि शेन वॉटसनने सावध खेळी केली. चेन्नईने पहिल्या ६ षटकांत एकही विकेट्स न गमावता ४४ धावा केल्या. मात्र ७व्या षटकांत शेन वॉटसन १४ धावा करत बाद झाला. वरुन चक्रवर्थीने चेन्नईला पहिला धक्का दिला.
शेन वॉटसन माघारी परतल्यानंतर अंबाती रायुडूने ऋतुराज गायकवाडसोबत चांगली भागिदारी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ऋतुराज गायकवाडने सलग दूसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकविले. यानंतर अंबाती रायुडू आणि ऋतुराज गायकवाडने ताबडतोड फलंदाजी करत ६८ धावांची भागिदारी केली. मात्र पॅट कमिन्सच्या गोलंदाजीसमोर अंबाती रायडु झेलबाद झाला. यानंतर १५ व्या षटकांत वरुन चक्रवर्थीने धोनीला बाद केले. दोन षटकांत चेन्नईच्या दोन गडी बाद झाल्याने चेन्नईपुढे मोठं संकट उभं राहिलं होतं.
धोनी बाद झाल्यानंतर सॅम कुरन फलंदाजीसाठी आला होता. एका बाजूला ऋतुराज गायकवाड आक्रमक खेळी खेळत होता. तर दूसरीकडे सॅम कुरनही त्याला चांगली साथ देत होता. मात्र १८व्या षटकांत पॅल कमिन्सच्या भेदक माऱ्यासमोर ऋतुराज गायकवाड बाद झाला. यानंतर १६ चेंडूत ३३ धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा फलंदाजी करण्यासाठी आला. जाडेना १९ षटकांत आक्रमक फलंदाजी करत २० धावा पटकावल्या. त्यामुळे २०व्या षटकांत म्हणजेच शेवटच्या षटकांत चेन्नईला १० धावांची आवश्यकता होती.
शेवटच्या षटकांत केकेआरचा गोलंदाज कमलेश नागरकोटीच्या गोलंदाजीवर रवींद्र जाडेजाच्या ताबडतोड फलंदाजीमुळे चेन्नईने केकेआरला ६ विकेट्सने पराभूत केले. तसेच या विजयामुळे आता केकेआरचा प्लेऑफसाठीचा मार्ग देखील खडतर झाला आहे. तर मुंबई इंडियन्सचे ्प्लेऑफचे स्थान पक्के झाले आहे.
तत्पूर्वी, केकेआरने प्रथम फलंदाजी करताना दीपक चहरच्या पहिल्याच षटकांत शुभमन गिल आणि नितेश राणाच्या तीन चौकारच्या जोरावर १३ धावा केल्या. त्यानंतर पुढच्या तीन षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. शुभमन गिल आणि नितीश राणाने देखील सावध खेळी करत धावा करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या ६ षटकांत केकेआरने ४८ धावा केल्या. यामध्ये शुभमन गिलने २४ धावा आणि नितीश राणाने २४ धावा केल्या.
८व्या षटकांत कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर शुभमन गिल बाद झाला. शुभमन गिलने ४ चौकारच्या जोरावर २६ धावा केल्या. शुभमन गिल बाद झाल्यानंतर केकेआरचा आक्रमक फलंदाज सुनील नरीन फलंदाजीसाठी आला. मात्र सुनील नरीनलाही धावा करण्यात यश मिळाले नाही. मिशेल सँटनरच्या गोलंदाजीसमोर ७ धावा करत सुनील नरीन झेलबाद झाला. सुनील नरीन बाद झाल्यानंतर नितीश राणाला साथ देण्यासाठी रिंकु सिंग फलंदाजीसाठी आला. रिंकू सिंगचा या हंगामातील आपला पहिलाच सामना आहे. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली वापसी करत केकेआरच्या धावा रोखण्यात यश मिळवले. केकेआरला १२ षटकांत ८६ धावांवरच मजल मारती आली. त्यानंतर १३व्या षटकांत रिंकू सिंग रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीसमोर झेलबाद झाला. रिंकू सिंगने ११ धावा केल्या.
रिंकू सिंग माघारी परतल्यानंतर केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नितेश राणासोबत भागिदारी करण्याचा प्रयत्न केला. केकेआरच्या विकेट्स जात असताना नितेश राणा मात्र धावसंख्या करण्यात व्यस्त होता. नितीश राणाने या हंगामातील तीसरे अर्धशतक झळकविले.
केकेआरने १६ षटकांत ३ विकेट्स गमावत १२५ धावा केल्या. यानंतर नितीश राणा आणि इयॉन मॉर्गनने शेवटच्या षटकांत ताबडतोड फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र लुंगी एंगिडीच्या गोलंदाजीवर नितीश राणा बाद झाला. नितेश राणाने १० चौकार आणि ४ षटकारच्या जोरावर ६१ चेंडूत ८७ धावा केल्या. नितेश राणा बाद झाल्यानंतर केकेआरचा उपकर्णधार दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी आला. यानंतर दिनेश कार्तिच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर केकेआरने चेन्नईपुढे १७३ धावांचे आव्हान ठेवले होते.
Web Title: CSK vs KKR Latest News: Chennai beat KKR by 6 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.