दुबई : प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेलेला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) उर्वरित संघांचे समीकरण बिघडविण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याचे पहिले लक्ष्य विजयासाठी आतुर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) असेले आज उभय संघांदरम्यान लढत होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
केकेआरने प्रथम फलंदाजी करताना दीपक चहरच्या पहिल्याच षटकांत शुभमन गिल आणि नितीश राणाच्या तीन चौकारच्या जोरावर १३ धावा केल्या. त्यानंतर पुढच्या तीन षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. शुभमन गिल आणि नितेश राणाने देखील सावध खेळी करत धावा करण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या ६ षटकांत केकेआरने ४८ धावा केल्या. यामध्ये शुभमन गिलने २४ धावा आणि नितीश राणाने २४ धावा केल्या.
८व्या षटकांत कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर शुभमन गिल बाद झाला. शुभमन गिलने ४ चौकारच्या जोरावर २६ धावा केल्या. शुभमन गिल बाद झाल्यानंतर केकेआरचा आक्रमक फलंदाज सुनील नरीन फलंदाजीसाठी आला. मात्र सुनील नरीनलाही धावा करण्यात यश मिळाले नाही. मिशेल सँटनरच्या गोलंदाजीसमोर ७ धावा करत सुनील नरीन झेलबाद झाला.
सुनील नरीन बाद झाल्यानंतर नितीश राणाला साथ देण्यासाठी रिंकु सिंग फलंदाजीसाठी आला. रिंकू सिंगचा या हंगामातील आपला पहिलाच सामना आहे. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली वापसी करत केकेआरच्या धावा रोखण्यात यश मिळवले. केकेआरला १२ षटकांत ८६ धावांवरच मजल मारती आली. त्यानंतर १३व्या षटकांत रिंकू सिंग रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीसमोर झेलबाद झाला. रिंकू सिंगने ११ धावा केल्या.
रिंकू सिंग माघारी परतल्यानंतर केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नितेश राणासोबत भागिदारी करण्याचा प्रयत्न केला. केकेआरच्या विकेट्स जात असताना नितीश राणा मात्र धावसंख्या करण्यात व्यस्त होता. नितीश राणाने या हंगामातील तीसरे अर्धशतक झळकविले.
केकेआरने १६ षटकांत ३ विकेट्स गमावत १२५ धावा केल्या. यानंतर नितेश राणा आणि इयॉन मॉर्गनने शेवटच्या षटकांत ताबडतोड फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र लुंगी एंगिडीच्या गोलंदाजीवर नितेश राणा बाद झाला. नितेश राणाने १० चौकार आणि ४ षटकारच्या जोरावर ६१ चेंडूत ८७ धावा केल्या.
नितीश राणा बाद झाल्यानंतर केकेआरचा उपकर्णधार दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी आला. यानंतर दिनेश कार्तिच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर केकेआरने चेन्नईपुढे १७३ धावांचे आव्हान ठेवले आहे.