इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आज अखेरचा सामना खेळत आहे. CSKचा संघ यंदाच्या लीगमधील प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिलाच संघ आहे. त्यामुळे आजचा सामना हा त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता आहे, परंतु दुसऱ्या टप्प्यात जबरदस्त कमबॅक करणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबसाठी ( Kings XI Punjab) ही लढत जिंकणे अनिवार्य आहे. यंदाच्या मोसमात CSKची कामगिरी ही निराशाजनक झाली आहे. १३ सामन्यांत त्यांना ५ विजय मिळवता आले आणि IPLच्या इतिहासात प्रथमच हा संघ प्ले ऑफमधून बाहेर फेकला गेला. या नामुष्कीनंतर IPL 2021साठी संघात बरेच बदल केले जातील, याचे संकेत फ्रँचायझीनं दिले. त्यामुळेच आज नाणेफेकीला जेव्हा महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) मैदानावर आला, तेव्हा त्याला चेन्नई सुपर किंग्सकडून हा तुझा अखेरचा सामना आहे का? असे विचारले गेले, त्यावर त्यानं भन्नाट उत्तर दिलं.
CSKनं यंदाच्या मोसमात सर्वांना निराश केले. पहिला सामना जिंकल्यानंतर CSKची गाडी रुळावरून जी घऱंगळत गेली, ती प्ले ऑफच्या शर्यतीतून बादच झाली. पण, मागील दोन सामन्यांत विजय मिळवून चेन्नईच्या खेळाडूंनी त्यांच्यातला स्पार्क दाखवला आहे. ऋतुराज गायकवाड व सॅम कुरन हे युवा खेळाडू CSKला मिळाले आहेत, तर फॅफ ड्यू प्लेसिस, रवींद्र जडेजा यांना भविष्यातही संघ कायम ठेवू शकतो. पुढील आयपीएलसाठी संघात बदल करताना MS Dhoni ला कायम ठेवले जाईल की नाही, याबाबत साशंकता होती.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ - फॅफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, एन जगदीसन, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, लुंगी एनगिडी, इम्रान ताहीर.
किंग्स इलेव्हन पंजाब - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, जेम्स निशॅम, दीपक हुडा, ख्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी
नाणेफेक करताना डॅनी मॉरिसन यांनी धोनीला विचारले की, येलो जर्सीत हा तुझा शेवटचा सामना आहे का?
त्यावर धोनी म्हणाला, नक्कीच नाही. धोनीच्या उत्तरानं त्याचे चाहते नक्कीच सुखावले असतील.
पाहा व्हिडीओ...
Web Title: CSK vs KXIP Latest News : Could this be the last match of yours in yellow jersey? MS Dhoni reply, Definitely not, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.