Join us  

CSK vs KXIP Latest News : महेंद्रसिंग धोनी IPL मधून निवृत्त होतोय? चर्चांवरील उत्तरानंतर ट्रेंड होतंय 'Definitely Not'!  

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आज अखेरचा सामना खेळत आहे. CSKचा संघ यंदाच्या लीगमधील प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिलाच संघ आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 01, 2020 4:11 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आज अखेरचा सामना खेळत आहे. CSKचा संघ यंदाच्या लीगमधील प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिलाच संघ आहे. त्यामुळे आजचा सामना हा त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता आहे, परंतु दुसऱ्या टप्प्यात जबरदस्त कमबॅक करणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबसाठी ( Kings XI Punjab) ही लढत जिंकणे अनिवार्य आहे. यंदाच्या मोसमात CSKची कामगिरी ही निराशाजनक झाली आहे. १३ सामन्यांत त्यांना ५ विजय मिळवता आले आणि IPLच्या इतिहासात प्रथमच हा संघ प्ले ऑफमधून बाहेर फेकला गेला. या नामुष्कीनंतर IPL 2021साठी संघात बरेच बदल केले जातील, याचे संकेत फ्रँचायझीनं दिले. त्यात महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) प्रत्येक सामन्यानंतर युवा खेळाडूंची घेत असलेली शाळा पाहून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत.  आज नाणेफेकीला जेव्हा धोनी मैदानावर आला, तेव्हा त्याला चेन्नई सुपर किंग्सकडून हा तुझा अखेरचा सामना आहे का? असे विचारले गेले, त्यावर त्यानं दिलेल्या भन्नाट उत्तराची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नाणेफेक करताना डॅनी मॉरिसन यांनी धोनीला विचारले की, येलो जर्सीत हा तुझा शेवटचा सामना आहे का? त्यावर धोनी म्हणाला, नक्कीच नाही. धोनीच्या उत्तरानं त्याचे चाहते नक्कीच सुखावले असतील. 

पाहा व्हिडीओ...

धोनीच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर  'Definitely Not' हे ट्रेंड होऊ लागले. 

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सकिंग्स इलेव्हन पंजाब