Join us  

CSK vs KXIP Latest News : Out or Not Out? थर्ड अम्पायरच्या निर्णयावर KXIPचा कर्णधार अन् प्रशिक्षक नाराज

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आज अखेरचा सामना खेळत आहे. CSKचा संघ यंदाच्या लीगमधील प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिलाच संघ आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 01, 2020 6:22 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आज अखेरचा सामना खेळत आहे. CSKचा संघ यंदाच्या लीगमधील प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिलाच संघ आहे. त्यामुळे आजचा सामना हा त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता आहे, परंतु दुसऱ्या टप्प्यात जबरदस्त कमबॅक करणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबसाठी ( Kings XI Punjab) ही लढत जिंकणे अनिवार्य आहे. यंदाच्या मोसमात CSKची कामगिरी ही निराशाजनक झाली आहे. १३ सामन्यांत त्यांना ५ विजय मिळवता आले आणि IPLच्या इतिहासात प्रथमच हा संघ प्ले ऑफमधून बाहेर फेकला गेला. तरीही CSKनं अखेरच्या साळखी सामन्यात सुरेख खेळ करताना KXIPच्या धावगतीला लगाम लावला. त्यानंतर CSKच्या फलंदाजांनी KXIPची धुलाई केली. यावेळी KXIPचा कर्णधार लोकेश राहुल व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी KXIPला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. लुंगी एनगिडीच्या चेंडूवर फटका मारताना अग्रवालच्या बॅटला लावून चेंडू यष्टिंवर आदळला. अग्रवाल १५ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीनं २६ धावांवर माघारी परतले. ९व्या षटकात एनगिडीनं KXIPला दुसरा धक्का दिला. लोकेश राहुल २९ धावांवर त्रिफळाचीत झाला. शार्दूल ठाकूरनं ११व्या षटकात निकोलस पूरनला (२) बाद केलं. ख्रिस गेलही ( १२) आज करिष्मा दाखवू शकला नाही. इम्रान ताहीरनं त्याला पायचीत केलं. 

मनदीप सिंग आणि दीपक हुडा हे चांगल्या टचमध्ये दिसले. संघातील अनुभवी व दिग्गज फलंदाज माघारी परतल्यानंतर ही युवा जोडी KXIPला सावरण्यासाठी पुढे आली. दोघांनी काही सुरेख फटकेही मारले, परंतु रवींद्र जडेजानं त्यांना मोठी खेळी करू दिली नाही. मनदीप (१४) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेल्या जिमी निशॅमचा अफलातून झेल ऋतुराज गायकवाडनं पकडला. KXIPसाठी हा मोठा धक्का ठरला. दीपक हुडानं एका बाजूनं फटकेबाजी करताना २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या फटकेबाजीनं KXIPला २० षटकांत ६ बाद १५३ असा समाधानकारक पल्ला गाठून दिला. हुडा ३० चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर नाबाद राहिला. 

प्रत्युत्तरात CSKचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी KXIPच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. दोघांनी ८व्या षटकात एकही विकेट न गमावता ६९ धावा केल्या. रवी बिश्नोईनं टाकलेल्या ८व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर गायकवाड बॅकवर्ड पॉईंटला झेलबाद झाला. मनदीप सिंगनं झेल टिपला आणि मैदानावरील पंचानी त्याला बाद दिले. पण, त्या झेलबद्दल थोडा डाऊट वाटत असल्यानं त्यांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. त्यात तिसऱ्या पंचांनी गायकवाडला नाबाद ठरवले. या निर्णयावर लोकेश राहुल व अनिल कुंबळे यांनी नाराजी व्यक्त केली.   

टॅग्स :IPL 2020लोकेश राहुलअनिल कुंबळेकिंग्स इलेव्हन पंजाबचेन्नई सुपर किंग्स