इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आज अखेरचा सामना खेळत आहे. CSKचा संघ यंदाच्या लीगमधील प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिलाच संघ आहे. त्यामुळे आजचा सामना हा त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता आहे, परंतु दुसऱ्या टप्प्यात जबरदस्त कमबॅक करणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबसाठी ( Kings XI Punjab) ही लढत जिंकणे अनिवार्य आहे. यंदाच्या मोसमात CSKची कामगिरी ही निराशाजनक झाली आहे. १३ सामन्यांत त्यांना ५ विजय मिळवता आले आणि IPLच्या इतिहासात प्रथमच हा संघ प्ले ऑफमधून बाहेर फेकला गेला.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ - फॅफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, एन जगदीसन, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, लुंगी एनगिडी, इम्रान ताहीर.
किंग्स इलेव्हन पंजाब - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, जेम्स निशॅम, दीपक हुडा, ख्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी
लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी KXIPला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. लुंगी एनगिडीच्या चेंडूवर फटका मारताना अग्रवालच्या बॅटला लावून चेंडू यष्टिंवर आदळला. अग्रवाल १५ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीनं २६ धावांवर माघारी परतले. ९व्या षटकात एनगिडीनं KXIPला दुसरा धक्का दिला. लोकेश राहुल २९ धावांवर त्रिफळाचीत झाला. शार्दूल ठाकूरनं ११व्या षटकात निकोलस पूरनला (२) बाद केलं. ख्रिस गेलही ( १२) आज करिष्मा दाखवू शकला नाही. इम्रान ताहीरनं त्याला पायचीत केलं.
मनदीप सिंग आणि दीपक हुडा हे चांगल्या टचमध्ये दिसले. संघातील अनुभवी व दिग्गज फलंदाज माघारी परतल्यानंतर ही युवा जोडी KXIPला सावरण्यासाठी पुढे आली. दोघांनी काही सुरेख फटकेही मारले, परंतु रवींद्र जडेजानं त्यांना मोठी खेळी करू दिली नाही. मनदीप (१४) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेल्या जिमी निशॅमचा अफलातून झेल ऋतुराज गायकवाडनं पकडला. KXIPसाठी हा मोठा धक्का ठरला.
पाहा व्हिडीओ..