CSK vs KXIPe :रैनाची धुव्वाधार फलंदाजी; चेन्नईचा पंजाबवर 5 गडी राखून विजय

करुण नायरची आक्रमक फटकेबाजी वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने चेन्नईविरुद्धच्या लढतीत मोठी धावसंख्या उभारण्यात किंग्स इलेव्हन पंजाबला अपयश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 08:18 PM2018-05-20T20:18:55+5:302018-05-21T00:16:07+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs KXIP Live Score News | CSK vs KXIPe :रैनाची धुव्वाधार फलंदाजी; चेन्नईचा पंजाबवर 5 गडी राखून विजय

CSK vs KXIPe :रैनाची धुव्वाधार फलंदाजी; चेन्नईचा पंजाबवर 5 गडी राखून विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

LIVE UPDATES :

यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील अखेरच्या सुपरसाखळी सामन्यात पंजाबविरुद्ध विजय मिळवत चेन्नई सुपरकिंग्ज संघाने रविवारी दिमाखात प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. चेन्नईकडून सुरेश रैनाने 48 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. तर चहारने 20 चेंडूत 39 धावा केल्या. या दोघांनीही खडतर परिस्थितीमधून संघाचा डाव सावरत चेन्नईला विजयसमीप आणून ठेवले. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. चेन्नईच्या संघाने हा सामना पाच गडी राखून जिंकला. 

तत्पूर्वी पंजाबकडून  करुण नायरची आक्रमक फटकेबाजी वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. रुण नायरने केलेल्या 26 चेंडूत 54 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबला सर्वबाद 153  धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबने चेन्नईसमोर विजयासाठी 154 धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईकडून लुंगी निगिडीने भेदक मारा करत पंजाबच्या 4 फलंदाजांना परतीची वाट दाखवली.  

 

11.47 महेंद्रसिंग धोनीने खेचला षटकार; चेन्नईचा पंजाबवर पाच गडी राखून विजय

11.45 रैनाची धुव्वाधार फलंदाजी

11.41 सुरेश रैनाचे शानदार अर्धशतक

11.34: चेन्नईला विजयासाठी 12 चेंडूत 23 धावांची गरज

11.30: चेन्नईला पाचवा धक्का; चहार 39 धावांवर बाद 

11.10- चेन्नईला विजयासाठी 47 चेंडूत 81 धावांची गरज

11.02PM - हरभजन सिंग बाद, चेन्नईला चौथा धक्का
 
10.30PM -
अंकित राजपूतने चेन्नईला पाठोपाठ दिले दोन धक्के, फाफ डू प्लेसिस आणि सॅम बिलिंग्स बाद

10.07PM -  चेन्नईला पहिला धक्का, अंबाती रायुडू बाद

पुणे - करुण नायरची आक्रमक फटकेबाजी वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने चेन्नईविरुद्धच्या लढतीत मोठी धावसंख्या उभारण्यात किंग्स इलेव्हन पंजाबला अपयश आले. करुण नायरने केलेल्या 26 चेंडूत 54 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबला सर्वबाद 153  धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबने चेन्नईसमोर विजयासाठी 154 धावांचे आव्हान ठेवले. चेन्नईकडून लुंगी निगिडीने भेदक मारा करत पंजाबच्या 4 फलंदाजांना परतीची वाट दाखवली.  


LIVE UPDATES : 

9.47PM - पंजाबचा डाव 153 धावांत आटोपला, लुंगी निडिगीचे चार बळी

9.42PM - करुण नायर बाद, पंजाबला नववा धक्का 

9.41PM - करुण नायरचे अर्धशतक, 25 चेंडूत पूर्ण केले अर्धशतक 

9.35PM - अॅण्ड्र्यू टाय शून्यावर बाद, पंजाबला आठवा धक्का
 

9.33PM - रविचंद्रन अश्विन बाद, पंजाबला सातवा धक्का

9. 27 PM - पंजाबला सहावा धक्का, अक्षर पटेल माघारी

9.17PM - 15 षटरांच्या समाप्तीनंतर किंग्स इलेव्हन पंजाबची 5 बाद  102 धावांपर्यंत मजल

9.06PM -   डेव्हिड मीलर बादपंजाबला पाचवा धक्का

9.01 PM - पंजाबला चौथा धक्का, मनोज तिवारी 35 धावांवर बाद

8.55PM - 10 षटकांनंतर पंजाबच्या 3 बाद 71 धावा

8.20PM - लोकेश राहुल त्रिफळाचीत, पंजाबला तिसरा धक्का

8.15 PM - गेलपाठोपाठ आरोन फिंचही माघारी, पंजाबला दुसरा धक्का
 
8.02PM - ख्रिस गेल शुन्यावर बाद, पंजाबला पहिला धक्का 

7.32 PM - चेन्नईने नाणेफेक जिंकली, घेतला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय 
पुणे  - किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघ आयपीएलमधील अखेरच्या सुपरसाखळीत रविवारी परस्परांपुढे उभे ठाकतील तेव्हा ‘प्ले आॅफ’साठी विजयासह धावसरासरी वाढविण्याचेही आव्हान असेल. पंजाबने सलग विजयाच्या सत्राची सुरुवात केल्यानंतरही १२ गुणांसह हा संघ सातव्या स्थानी आहे. 

Web Title: CSK vs KXIP Live Score News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.