ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनी संपला, असे म्हणणाऱ्यांना माहीने आपल्या धडाकेबाज फटकेबाजीनेच चोख उत्तर दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला त्यांच्या घरच्या मैदानात धोनीने यजमानांना मैदानाचा प्रत्येक कोपरा दाखवला.
धो...धो... धोनी... चेन्नईचा बंगळुरुवर पाच विकेट्सने रोमहर्षक विजय
बंगळुरु : महेंद्रसिंग धोनी संपला, असे म्हणणाऱ्यांना माहीने आपल्या धडाकेबाज फटकेबाजीनेच चोख उत्तर दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला त्यांच्या घरच्या मैदानात धोनीने यजमानांना मैदानाचा प्रत्येक कोपरा दाखवला. यॉर्करसारखे चेंडू सीमारेषेपार कसे धाडायचे, याचा उत्तमवस्तुपाठ धोनीने या खेळीतून दाखवला. धोनीला यावेळी अंबाती रायुडूची सुरेख साथ लाभली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयात मोलाची भूमिका वठवली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला बंगळुरुवर पाच विकेट्स राखून विजय मिळवता आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
प्रथम फलंदाजी करताना डी' व्हिलियर्सने 30 चेंडूंत 2 चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर 68 धावांची तुफानी खेळी साकारली. डी' कॉकने 53 धावांची खेळी साकारत डी' व्हिलियर्सला सुयोग्य साथ दिली. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगळुरुने चेन्नईपुढे 206 धावांचे आव्हान ठेवले होते. धोनी आणि रायुडूने दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. धोनीने 34 चेंडूंत एक चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 70 धावांची धडाकेबाज खेळी साकारली, तर रायुडूने 53 चेंडूंत 3 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर 82 धावा केल्या.
11.49 PM : चेन्नईला विजयासाठी 4 चेंडूंत 6 धावांची गरज
11.46 PM : चेन्नईला विजयासाठी 6 चेंडूंत 16 धावांची गरज
11.37 PM : चेन्नईला विजयासाठी 12 चेंडूंत 30 धावांची गरज
11.35 PM : चेन्नईला पाचवा धक्का; अंबाती रायुडू बाद
- अठराव्या षटकात अंबाती रायुडू धावचीत झाला आणि चेन्नईला पाचवा धक्का बसला. रायुडूने 53 चेंडूंत 3 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर 82 धावा केल्या.
11.33 PM : षटकारासह धोनीचे अर्धशतक
- धोनीने अठराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावत 29 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधले त्याचे हे 19वे अर्धशतक ठरले.
11.30 PM : चेन्नईला विजयासाठी 18 चेंडूंत 45 धावांची गरज
11.24 PM : चेन्नईला विजयासाठी 24 चेंडूंत 55 धावांची गरज
11.23 PM : जीवदानानंतर अंबाती रायुडूचे सलग दोन षटकार
- कोरे अँडरसनच्या सोळाव्या षटकात मिळालेल्या जीवदानाचा फायदा यावेळी रायुडूने उचलला. या षटकामध्येच रायुडूने सलग दोन षटकार लगावले.
11.20 PM : अंबाती रायुडूला 61 धावांवर जीवदान
- चेन्नईच्या अंबाती रायुडूला 61 धावांवर असताना बंगळुरुच्या उमेश यादवने झेल सोडून जीवदान दिले.
11.16 PM : चेन्नई 15 षटकांत 4 बाद 135
11.11 PM : षटकारासह अंबाती रायुडूचे अर्धशतक
- 14व्या षटकात अंबाती रायुडूने षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले.
11.10 PM : धोनीचे सलग दोन षटकार
- पवन नेगीच्या 14व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार खेचत धोनीने आपण फॉर्मात आल्याचे दाखवून दिले.
11.07 PM : चेन्नईला विजयासाठी सात षटकांत 99 धावांची गरज
11.00 PM : धोनीचा गगनभेदी षटकार
- कोरे अँडरसनच्या बाराव्या षटकात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने उत्तुंग षटकार लगावत चाहत्यांची मने जिंकली.
10.53 PM : चेन्नई 11 षटकांत 4 बाद 90
10.40 PM : रवींद्र जडेजा बाद; चेन्नईला चौथा धक्का
- फिरकीपटू युजवेंद्र चहलने जडेजाला त्रिफळाचीत करत चेन्नईला चौथा धक्का दिला.
10.25 PM : सॅम बिलिंग्स बाद; चेन्नईला तिसरा धक्का
- बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने बिलिंग्सला चकवत यष्टीचीत केले. चेन्नईसाठी हा तिसरा धक्का होता.
10.12 PM : अंबाती रायुडूचे सलग दोन षटकार
- वॉशिंग्टन सुंदरच्या तिसऱ्या षटकात चेन्नईचा सलामीवीर अंबाती रायुडूने सलग दोन षटकार लगावले.
10.05 PM : चेन्नईला पहिला धक्का; वॉटसन पहिल्याच षटकात बाद
- षटकार लगावल्यावर त्यानंतरच्याच सहाव्या चेंडूवर वॉटसनला पवन नेगीने बाद केले. चेन्नईसाठी हा पहिला धक्का होता.
10.03 PM : चेन्नईच्या वॉटसनने षटकाराने उघडले खाते
डी' व्हिलियर्सचे बंगळुरुत पुन्हा वादळ; चेन्नईपुढे 206 धावांचे आव्हान
बंगळुरु : एबी डी' व्हिलियर्स नावाचे वादळ पुन्हा एकदा बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घोंगावले. आपल्या शैलीदार फटकेबाजीच्या जोरावर डी' व्हिलियर्सने चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. डी' व्हिलियर्सने डी' कॉकला आपल्या साथीला घेत दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचली, त्यामुळेच बंगळुरुच्या संघाला चेन्नईपुढे 206 धावांचे आव्हान ठेवता आले. डी' व्हिलियर्सने 30 चेंडूंत 2 चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर 68 धावांची तुफानी खेळी साकारली. डी' कॉकने 53 धावांची खेळी साकारत डी' व्हिलियर्सला सुयोग्य साथ दिली.
9.44 PM : बंगळुरुचे चेन्नईपुढे 206 धावांचे आव्हान
9.41 PM : बंगळुरुला आठवा धक्का; उमेश यादव बाद
9.39 PM : बंगळुरुला सातवा धक्का; पवन नेगी धावबाद
9.37 PM : बंगळुरुला सहावा धक्का; कॉलिन डी ग्रँडहोम बाद
9.36 PM : बंगळुरुला पाचवा धक्का; मनदीप सिंग बाद
- शार्दुल ठाकूरने 19व्या षटकात मनदीप सिंगला बाद करत बंगळुरुला पाचवा धक्का दिला.
9.30 PM : बंगळुरु18 षटकांत 4 बाद 173
9.16 PM : बंगळुरुला चौथा धक्का; कोरे अँडरसन बाद
- इम्रान ताहिरने डी'व्हिलियर्सला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर अँडरसनलाही तंबूचा रस्ता दाखवला.
9.14 PM : बंगळुरुला मोठा धक्का; डी'व्हिलियर्स बाद
- इम्रान ताहिरने डी'व्हिलियर्सला बाद करत बंगळुरुला मोठा धक्का दिला. डी'व्हिलियर्सने 30 चेंडूंत 2 चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर 68 धावांची तुफानी खेळी साकारली.
9.06 PM : बंगळुरुला दुसरा धक्का; डी'कॉक बाद
- ड्वेन ब्राव्होने आपल्याच गोलंदाजीवर झेल पकडत डी'कॉकला माघारी धाडले. डी'कॉकने 37 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 53 धावा केल्या.
9.02 PM : डी'व्हिलियर्सचे सलग तीन षटकार
- शार्दुल ठाकूरच्या 13व्या षटकाच्या पहिल्या तिन्ही चेंडूंवर डी'व्हिलियर्सने सलग तीन षटकार लगावले आणि चेन्नईच्या गोलंदाजीतील हवा काढून टाकली.
8.56 PM : डी'व्हिलियर्सचे 23 चेंडूंत अर्धशतक
- डी'व्हिलियर्सने आपल्या धडाकेबाज शैलीत चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलात समाचार घेत 23 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
8.47 PM : षटकारासह डी'कॉकचे अर्धशतक पूर्ण
- शेन वॉटसनच्या बाराव्या षटकात डी'कॉकने षटकार फटकावत आपले अर्धशतक पूर्ण केले.
8.38 PM : बंगळुरु दहा षटकांत 1 बाद 87
8.29 PM : एबी डी'व्हिलियर्स तळपला; हरभजनच्या सहाव्या षटकात दोन षटकार
- हरभजनच्या सहाव्या षटकात एबी डी'व्हिलियर्सने दोन षटकार आणि एका चौकारासह 17 धावा लूटल्या.
8.24 PM : बंगळुरु पाच षटकांत 1 बाद 35
8.20 PM : विराट कोहली OUT; बंगळुरुला मोठा धक्का
- शार्दुल ठाकूरने विराट कोहलीला रवींद्र जडेजाकरवी झेलबाद करत बंगळुरुला मोठा धक्का दिला. कोहलीने 15 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या.
8.12 PM : डी'कॉकचा तिसऱ्या षटकात उत्तुंग षटकार
- बंगळुरुचा सलामीवीर डी'कॉकने तिसऱ्या षटकात उत्तुंग षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले.
8.04 PM : विराट कोहलीचा बंगळुरुसाठी पहिला चौकार
- दीपक चहारच्या पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहली संघासाठी पहिला चौकार लगावला.
7.31 PM : हरभजन आणि ताहिरला चेन्नईच्या संघात स्थान
7.28 PM : चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली
आजी-माजी कर्णधारांमधली चुरशीची लढत ; चेन्नई-बंगळुरु आमने-सामने
बंगळुरु : एक भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, म्हणजेच कॅप्टन कूल आणि त्याच्यापुढे आव्हान असेल ते विद्यमान कर्णधार आणि अँग्री यंग मॅन विराट कोहलीचे. दक्षिण भारतातील चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ बुधवारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या सामन्यात धोनी आणि कोहली यांच्यापैकी कोण सरस कर्णधार ठरणार, याची उत्सुकता क्रिकेट जगताला असेल.
दोन्ही संघ
दोन्ही संघांचे स्टेडियममध्ये आगमन
Web Title: CSK vs RCB, IPL 2018 LIVE: Harbhajan and Tahir are in the squad for Chennai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.