Indian Premier League ( IPL 2020) चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings)च्या गोलंदाजांची विराट कोहलीनं ( Virat Kohli) धुलाई केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं अखेरच्या 5 षटकांत 74 धावा चोपल्या. त्याच्या जोरावर RCBनं 4 बाद 169 धावा केल्या. या सामन्यात अनुष्का शर्माच्या उपस्थितीनं सर्वांचे लक्ष वेधले.
RCBचा कर्णधार विराट कोहली यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आरोन फिंच हा माघारी परतल्यानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) देवदत्त पडीक्कलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पण, शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) एकाच षटकात RCBला दोन धक्के दिले. पडीक्कल ( 33) पाठोपाठ एबी डिव्हिलियर्सलाही त्यानं शून्यावर माघारी पाठवले. पण, कोहली दुसऱ्या बाजूनं खिंड लढवत होता आणि त्यानं यासह विक्रमी कामगिरी केली. विराटनं आजच्या सामन्यात मोठा पराक्रम केला. शिवम दुबे आणि विराट यांनी 76 धावांची भागीदारी करताना RCBला मोठा पल्ला गाठून दिला. विराटनं 52 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 90 धावा कुटल्या. दुबे 14 चेंडूंत नाबाद 22 धावा केल्या.