Join us  

CSK vs RCB Latest News : महेंद्रसिंग धोनीचे अनोखं त्रिशतक; असा पराक्रम करणारा तिसरा भारतीय

CSK vs RCB Latest News : चेन्नई सुपर किंग्स अडचणीत, निम्मा संघ माघारी

By स्वदेश घाणेकर | Published: October 10, 2020 10:57 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings)च्या गोलंदाजांची विराट कोहलीनं ( Virat Kohli) धुलाई केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं अखेरच्या 5 षटकांत 74 धावा चोपल्या. त्याच्या जोरावर RCBनं 4 बाद 169 धावा केल्या.  महेंद्रसिंग धोनी आज फटकेबाजीच्या मुडमध्ये होता, परंतु युजवेंद्र चहलच्या लेग स्पीनवर सीमारेषेवर तो झेल देऊन माघारी परतला. त्याच षटकात खणखणीत षटकार खेचून त्यानं एक विक्रमाला गवसणी घातली. 

RCBचा कर्णधार विराट कोहली यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आरोन फिंच हा माघारी परतल्यानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) देवदत्त पडीक्कलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पण, शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) एकाच षटकात RCBला दोन धक्के दिले. पडीक्कल ( 33) पाठोपाठ एबी डिव्हिलियर्सलाही त्यानं शून्यावर माघारी पाठवले. पण, कोहली दुसऱ्या बाजूनं खिंड लढवत होता आणि त्यानं यासह विक्रमी कामगिरी केली. विराटनं आजच्या सामन्यात मोठा पराक्रम केला.  शिवम दुबे आणि विराट यांनी 76 धावांची भागीदारी करताना RCBला मोठा पल्ला गाठून दिला. विराटनं 52 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 90 धावा कुटल्या. दुबे 14 चेंडूंत नाबाद 22 धावा केल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली. फॅफ ड्यू प्लेसिस आणि शेन वॉटसन हे दोघंही २५ धावांवर माघारी परतले. वॉशिंग्टन सुंदर यानं पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये आपली ताकद दाखवली. त्यानं दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. चेन्नईच्या फलंदाजांना त्यानं जखडून ठेवले होते. त्यामुळेच त्यांना पहिल्या दहा षटकांत ४५ धावा करता आल्या. पण, खेळपट्टीवर स्थिर झालेल्या अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नारायण जगदीसन ( Narayan Jagadeesan) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. जगदीसन ३३ धावांवर धावबाद झाला. महेंद्रसिंग धोनी आज फटकेबाजीच्या मुडमध्ये होता, परंतु युजवेंद्र चहलच्या लेग स्पीनवर सीमारेषेवर तो झेल देऊन माघारी परतला. त्याच षटकात खणखणीत षटकार खेचून धोनीनं ट्वेंटी-20त ३०० षटकारांचा विक्रम नावावर केला.सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय रोहित शर्मा - ३७५सुरेश रैना - ३११ महेंद्रसिंग धोनी - ३०० 

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीसुरेश रैनारोहित शर्माचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर